Joe Root ICC Test Batting Ranking: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याचा फॉर्म हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून दाखवली आहे. या खेळीचा त्याला जो रूटला मोठा फायदा झाला आहे आणि त्याने आयसीसीच्या जागतिक कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्यामुळे त्याला आता पकडणं अन्य फलंदाजांना अवघड झाले आहे.
रूट ९२२ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानावर मजबूतीने बसला आहे आणि त्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या केन विलियम्सनपेक्षा ( ८५९) ६३ गुणांनी आघाडीवर गेला आहे. रूटला आता त्याचा वैयक्तिक ९२३ पॉईंट्सचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जो त्याने जुलै २०२२ मध्ये भारताविरुद्धच्या एडबस्टन कसोटीनंतर नोंदवला होता. लेन हटन, जॅक हॉब्स व पीटर मे हे इंग्लंडचे तीन खेळाडू असे आहेत, ज्यांनी रूटपेक्षा जास्ट रेटिंग पॉईंट्स कमावले आहेत.
दोन्ही डावांत शतक झळकावूनही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत गस एटकिन्सनने भाव खाल्ला... त्याने अष्टपैलू कामगिरी करून दाखवली होती. कसोटीत शतक आणि पाच विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ४८ स्थानांची झेप घेताना अष्टपैलू खेळाडूंमध्ये टॉप २० मध्ये स्थान पटकावले, तर गोलंदाजांमध्ये टॉप ३० मध्ये आला.
फलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ ( ७५७) एक स्थान वर सरकून तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला त्याने मागे टाकले. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल व विराट कोहली अनुक्रमे ६, ७ व ८ व्या क्रमांकावर कायम आहेत.