Joe Root : पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेत इंग्लिश फलंदाज जो रूटने नवा विक्रम रचला आहे. रूट कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यावेळी रूटने अॅलिस्टर कूकचा विक्रम मोडला आहे. तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय दिग्गज खेळाडू राहूल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली व यादीत त्याने चौथे स्थान मिळवले आहे.
मुल्तान येथे सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेत रूटने ५ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. या ७२ धावांसह रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या १२४७३ धावा पूर्ण केल्या व दोन विक्रम रचले आहेत. याआधी इंग्लंडसाठी १२४७२ धावा करणाऱ्या अॅलिस्टर कूकला रूटने मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. तर रूटने ९९ अर्धशतके पूर्ण करत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहूल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली आणि सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादित पाचवे स्थान गाठले. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर (१५९२१), दुसऱ्या स्थानावर रिकी पॉटींग (१३३७८), तिसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस (१३२८९) तर चौथ्या क्रमांकावर राहूल द्रविड(१३२८८) आहे.
पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करत ५५६ धावसंख्या उभारली. या डावात पाकिस्तानच्या ३ खेळाडूंनी शतकी खेळी केली. सलामीवीर अब्दुला शफीकने १० चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने १७७ चेंडूमध्ये १५५ धावांची कप्तानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार व २ षटकार ठोकले. तर अष्टपैलू खेळाडू सलमान अली अघा याने १०४ धावा पूर्ण करत शतक ठोकले. या तिघांच्या शतकामुळे व साउद शकीलच्या ८२ धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांचा टप्पा गाठला.
प्रत्युत्तरात इंग्लंड संघ २ विकेट्स गमावत २३३ धावांवर खेळत आहे. सलामीवीर झॅक क्रॉलीने फलंदाजीला सुंदर सुरवात केली. तर कर्णधार ऑली पोप शून्यावर परतला. त्यानंतर झॅक क्रॉली आणि जो रूटने ९९ धावांची मोठी भागीदारी केली. पुढे झॅक क्रॉली ७८ धावांवर परतला. नंतर रूटने बेन डकेटला साथीला घेत इंग्लंडसाठी २३३ धावांचा टप्पा गाठला आहे. जो रूट सध्या ५ चौकारंसह ७३ धावांर खेळत आहे. तर बेन डकेट आक्रमक फलंदाजी करत ६८ चेंडूत ८० धावांवर खेळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.