England vs West Indies 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतून इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने पुनरागमन केले आहे. बटलर २०२४ टी२० वर्ल्ड कपनंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण आता त्याने पुनरागमन केले आहे.
परंतु, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात गुडाकेश मोती घेतलेल्या अफलातून झेलामुळे बटलरला त्याचं धावांचं खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार खेळ करत इंग्लंडला विजय मिळवून देण्यातही मोलाचा वाटा उचलला आहे.