Team India | Jos Buttler
Team India | Jos ButtlerSakal

IND vs ENG: 'भारतीय संघ आक्रमक खेळणार, तर आम्ही पण...', सेमीफायनलपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बटलरनं फुंकलं रणशिंग

T20 World Cup 2024 Semi Final: भारताविरुद्ध टी20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने त्याचा संघ लढतीसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
Published on

T20 World Cup 2024, India vs England: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळवला जाणार आहे. हा सामना गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात दाखल होणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपणार आहे. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा राहणार आहे.

दरम्यान, भारतीय संघ या सामन्यात अपराजित आहे, तर इंग्लंड गतविजेते आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होईल असे मत अनेकांनी मांडलं आहे. आता या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Team India | Jos Buttler
David Warner: वॉर्नरने निवृत्ती घेताच रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला, 'आता अवघड आहे की...'

त्याने म्हटले आहे की भारतीय संघ आक्रमक खेळला, तर इंग्लंडही तसेच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बटलरने भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ४१ चेंडूतील ९२ धावांच्या खेळीचेही कौतुक केले आहे.

द स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार बटलर म्हणाला, 'आम्ही इथे अगदी वेगळ्या भारतीय संघाशी खेळणार आहोत. रोहितने संघाचे चांगले नेतृत्व केले आहे, तसेच त्याने चांगली फलंदाजीही केली, भारतीय संघ खूप स्वातंत्र्यतेने खेळत असून ते खूप आक्रमकही खेळले आहेत.'

Team India | Jos Buttler
T20 World Cup 2024: '...माझ्या डोळ्यात पाणी आलं', गुलबदिन नैबच्या क्रॅम्पवर काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार?

तो म्हणाला, 'साल 2022 च्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यांच्यात हा बदल झाला असून ते वनडे वर्ल्ड कपही असाच खेळले आहेत. आक्रमक खेळताना त्यांच्यात आत्मविश्वासही दिसतो आणि आम्ही त्यासाठी सज्ज देखील आहोत. आम्हाला माहित आहे की ते आक्रमक खेळतील आणि आम्हीही त्यांच्याविरुद्ध तसेच खेळू.'

दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघात 2022 टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतही सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा हे दोन संघ टी२० वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यातच आमने-सामने येणार आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.