Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Justin Langer
Indian Team Coach esakal
Updated on

Indian Team Head Coach : भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा टी 20 वर्ल्डकपनंतर कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची रिक्त होणारी जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहे. मात्र एका पाठोपाठ एक दिग्गज माजी खेळाडू टीम इंडियाचा कोच होण्यास नकार देत आहेत.

राहुल द्रविडने या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास फारशी उत्सुकता दाखवली नाही. दुसरीकडं एनसीएचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरने देखील आपण रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केले.

Justin Langer
IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे ही जगातील एक मोठी जबाबदारी आहे. जस्टिन लँगर म्हणाला की जर टायमिंग योग्य नसेल तर हा सर्वात थकवणारा जॉब असणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सत्रात जस्टिन लँगर हा लखनौ सुपर जायंट्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबबादारी सांभाळत आहे.

लँगरला अनेकवेळा भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार का असे विचारण्यात आलं आहे. लँगर याबाबत बोलताना म्हणाला की, 'भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणे हे क्रिकेट जगतातील सर्वात मोठे काम आहे.'

तो पुढे म्हणाला की, 'एक तर एवढं जास्त क्रिकेट होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे. हा खूप आव्हानात्मक आणि रोमांचक जॉब आहे. त्यामुळे टायमिंग योग्य असणं गरजेचं आहे. मी ऑस्ट्रेलिया संघासोबत जवळपास चार वर्षे होतो. हा जॉब खूप थकवणारा आहे. राहुल द्रविड आणि रवी शास्त्री देखील माझ्या मताशी सहमत असतील.'

Justin Langer
Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

जस्टीन लँगर म्हणाला की, भारतीय संघावर जिंकण्याचा प्रचंड दबाव आहे. जो कोणी पुढचा प्रशिक्षक असेल तो खूप उत्साही असला पाहिजे.

बीसीसीआयने गौतम गंभीरशी साधला संपर्क

द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून बीसीसीआय गौतम गंभीरकडे पाहत आहे. सध्या केकेआरचा मेंटॉर असलेल्या गंभीरशी बीसीसीआयने संपर्क साधल्याचे वृत्त इएसपीएन क्रिकइन्फोने दिले होते.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.