Kamindu Mendis ने मोडला कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम! 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई, तर ब्रॅडमन यांच्याशीही बरोबरी

Kamindu Mendis equals Don Bradman Record with 5th Test Century: श्रीलंकेचा फलंदाज कामिंडू मेंडिसने न्यूझीलंडविरुद्ध दीडशतकी खेळी करण्याबरोबरच विनोद कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
Kamindu Mendis Broke Vinod Kambli Record
Kamindu Mendis Broke Vinod Kambli RecordSakal
Updated on

Sri Lanka vs New Zealand, 2nd Test: श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (२६ सप्टेंबर) गॉलमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात श्रीलंकेचा २५ वर्षीय अष्टपैलू कामिंडू मेंडीसने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने पहिल्या डावात शानदार खेळ केला. त्यांनी पहिला डाव १६३.४ षटकात ५ बाद ६०२ धावांवर घोषित केला.

श्रीलंकेने डाव घोषित केला, तेव्हा कामिंडू मेंडिस २५० चेंडूत १८२ धावांवर नाबाद होता. त्याने या खेळीत १६ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच कुशल मेंडिसनेही शतकी खेळी करताना नाबाद १०६ धावा केल्या.

कामिंडूची ब्रॅडमनशी बरोबरी

दरम्यान कामिंडूचा हा कारकिर्दीतील आठवाच सामना आहे. त्याने १३ व्या डावातच त्याच्या कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावताना कसोटीत १००० धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे आता त्याने कसोटीमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

ब्रॅडमन यांनीही १३ डावातच १००० धावा पूर्ण केल्या होत्या. यामुळे आता या विक्रमाच्या यादीत ब्रॅडमन आणि कामिंडू यांच्यावर फक्त हबर्ट सटक्लिफ आणि इव्हर्टन विक्स आहेत. सटक्लिफ आणि विक्स या दोघांनीही प्रत्येकी १२ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

Kamindu Mendis Broke Vinod Kambli Record
IND vs BAN: आकाश दीपचा DRS चा आग्रह अन् कॅप्टन रोहितही रिव्ह्यू पाहून शॉक, पाहा Viral Video

कांबळीचा विक्रम मोडला

तथापि, कामिंडू हा अवघ्या १३ कसोटी डावात १००० धावा पूर्ण करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताच्या विनोद कांबळीच्या नावावर होता. विनोद कांबळीने १९९४ साली वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना १४ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

याशिवाय कामिंडूने १३ डावात ५ शतके करण्याचा ब्रॅडमन यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. पहिल्या १३ डावात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ब्रॅडमन आणि कामिंडूच्या वर अव्वल स्थानी ऑस्ट्रेलियाचे निल हार्वे असून त्यांनी पहिल्या १३ डावात ६ शतके केली होती.

गावसकरांच्या विक्रमाशीही बरोबरी

कामिंडू मेंडिसने आत्तापर्यंत ८ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे कारकिर्दीतील पहिल्या ८ कसोटींमध्ये सर्वाधिकवेळा ५० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सुनील गावसकर यांच्याशी बरोबरी केली आहे.

गावसकर यांनीही पहिल्या ८ कसोटींमध्ये ९ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यांनी ४ शतके आणि ५ अर्धशतके केली होती.

Kamindu Mendis Broke Vinod Kambli Record
IND vs BAN: कानपूरमध्येच खेळणार कारकिर्दीचा शेवटचा सामना? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं की...

श्रीलंकेच्या तीन खेळाडूंची शतके

दरम्यान, श्रीलंकेच्या पहिल्या डावात कामिंडू मेंडिस आणि कुशल मेंडिस यांच्यापूर्वी दिनेश चंडिमलनेही शतक केले होते. त्याने २०८ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. त्यामुळे या एकाच डावात तीन श्रीलंकन फलंदाजांची शतके पाहायला मिळाली.

याशिवाय अँजेलो मॅथ्युजने ८८ धावांची खेळी केली. तसेच करुणारत्नेने ४६ धावांची, तर कर्णधार धनंजय डी सिल्वाने ४४ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने ३ विकेट्स घेतल्या, तर कर्णधार टीम साऊथीने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.