Kane Williamson Video : विलियमसनबाबत 12 वर्षानंतर असं घडलं; विल यंग धडकला नसता तर कदाचित...

Kane Williamson Video : न्यूझीलंडचे तब्बल 4 फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले. सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
Kane Williamson
Kane Williamson esakal
Updated on

Kane Williamson Run Out Video : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना हा वेलिंग्टन येथे सुरू आहे. पहिल्या डावात यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वाईड बॉलचा विक्रम केल्यानंतर आता फलंदाजीतही मोठा गोंधळ घालून ठेवला. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियमसन हा तब्बल 12 वर्षांनी धावबाद झाला. त्यालाही त्याचाच पार्टनर विल यंग कारणीभूत ठरला. (Cricket News In Marathi)

Kane Williamson
Match Fixing Video : आयपीएल प्लेअरने केले मॅच फिक्सिंगचे आरोप... बंगाल क्रिकेट बोर्डाच्या सचिवापर्यंत धागेदोरे?

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात कॅमेरून ग्रीनच्या धडाकेबाज 174 धावांच्या जोरावर 383 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडला आपल्या पहिल्या डावात फक्त 179 धावा करता आल्या. न्यूझीलंडचा अव्वल फलंदाज केन विलियमसन हा विचित्र पद्धतीने धावबाद झाला. त्याची अन् विल यंगची टक्कर झाल्यामुळे तो शुन्यावरच धावबाद झाला.

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. शॉट मारल्यानंतर विलियमसन हा चेंडू पाहत होता. यावेळीच यंग आणि त्याची टक्कर झाली. याचा फायदा घेत मिड ऑफला उभ्या असलेल्या मार्नसने थेट फेकीद्वारे विलियमसनला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरी विकेट मिळवून दिली. केन विलियमसन 2012 नंतर दुसऱ्यांदाच धावबाद झाला आहे.

Kane Williamson
NZ vs AUS : न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर! नावावर केला हा अप्रिय विक्रम

न्यूझीलंडच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर न्यूझीलंडचा पहिला डाव 179 धावात संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 71 चेंडूत 70 धावांची खेळी केली. त्यानंतर मॅट हेन्रीने 34 चेंडूत 42 धावा करत त्याला चांगली साथ दिली. मात्र किवींचे चार फलंदाज भोपळाही न फोडता माघारी गेले. तर एकूण सात फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.

दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 13 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडे आता दुसऱ्या डावात 217 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने 174 धावांची नाबाद खेळी केली तर गोलंदाजीत नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हेजलवडूने दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.