IND vs NZ: पुणे कसोटीत केन विलियम्सन खेळणार की नाही? न्यूझीलंड क्रिकेटने दिले मोठे अपडेट्स

New Zealand updates on availability of Kane Williamson in Pune Test: न्यूझीलंडला पुण्यात भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी केन विलियम्सन उपलब्ध आहे की नाही, याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.
Kane Williamson | New Zealand
Kane Williamson | New ZealandSakal
Updated on

India vs New Zealand Pune Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारत दौऱ्याला शानदार सुरूवात केली. कसोटी मालिकेतील बंगळुरूला झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. आता भारत आणि न्यूझीलंड संघात २४ ऑक्टोबरपासून पुण्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड क्रिकेटने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन अद्याप भारत दौऱ्यावर आलेला नाही. त्यामुळे तो बंगळुरूला झालेल्या सामन्यातही खेळला नव्हता. आता तो पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही विलियम्सन खेळणार नाही, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

त्याला गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मांड्यांजवळ वेदना जाणवल्या होत्या. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत अधिक जोखीम न्यूझीलंड घेऊ इच्छित नाही. तो अद्यापही या दुखापतीतून सावरत आहे. त्याच्यावर न्यूझीलंडची मेडिकल टीम देखरेख करत आहे.

Kane Williamson | New Zealand
IND vs NZ 2nd Test : Rishabh Pant पुणे कसोटीला मुकणार? गौतम गंभीर, रोहित शर्मा यांना अजित आगरकरच्या 'त्या'सूचना अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.