''गौतम गंभीर प्रशिक्षक होत असेल तर...''; कपिल देव यांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Kapil Dev on Gautam Gambhir Coaching : राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली.
Kapil Dev on Gautam Gambhir Coaching
Kapil Dev on Gautam Gambhir Coachingsakal
Updated on

Kapil Dev on Gautam Gambhir Coaching : गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा श्रीलंकेचा असणार आहे. २७ जुलैपासून ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेला सारुवात होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यास नकार दिला. त्यानंतर बीसीसीआयने गौतमची निवड केली.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ WTC फायनल, वन डे वर्ल्ड कप फायनल खेळला आणि २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. आता ही यशस्वी परंपरा कायम राहण्याचे आव्हान गौतम गंभीरसमोर आहे. गौतमने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे दोन वर्ष मेंटॉर म्हणून काम पाहिले. या दोन्ही वर्षांत संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला. त्यानंतर २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून परतला आणि संघाला १२ वर्षांनी जेतेपद जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या रणनीतीने KKR ने तिसरे आयपीएल जेतेपद नावावर केले.

Kapil Dev on Gautam Gambhir Coaching
India Squad for Sri Lanka Tour : सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; रोहित शर्मा, विराट कोहलीचा मोठा निर्णय

भारताचे महान कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी गौतम गंभीरला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करेल, अशी आशाही कपिल देव यांनी व्यक्त केली.

''गौतम गंभीर जर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत, असेल माझ्याकडून त्याला आणि संघाला शुभेच्छा...आपला संघ ज्याप्रकारे चांगली कामगिरी करत आला आहे, तशीच तो पुढे कायम राखेल, अशी माझी आशा आहे. भारतीत खेळाडूंना ऑल दी बेस्ट,''असे कपिल देव PTI सोबत बोलताना म्हणाले.

Kapil Dev on Gautam Gambhir Coaching
India squad for SL Tour : रोहित शर्माने पडद्यामागून हार्दिक पांड्याचा गेम केला? गौतम गंभीरसोबत मिळून मोठा डाव टाकला

गौतम गंभीरकडून द्रविडचे अभिनंदन...

“माझ्या तिरंग्याची, माझ्या लोकांची, माझ्या देशाची सेवा करणे हा अत्यंत सन्मान आहे. मी राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या टीमचे अभिनंदन करण्यासाठी या संधीचा लाभ घेऊ इच्छितो. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यासाठी मी उत्साहित आहे,” असे गंभीरने एका निवेदनात म्हटले होते.

तो पुढे म्हणालेला, “मी खेळत होतो, तेव्हा मला ब्ल्यू जर्सी घातल्याचा अभिमान वाटायचा. क्रिकेट ही माझी आवड आहे आणि मी बीसीसीआय, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, सपोर्ट स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.