भारतीय फलंदाज इरेला पेटला! केली रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी; IPL 2025 पूर्वी फ्रँचायझींना दाखवला दम...

Karun Nair record Breaking : भारतीय फलंदाजाने नुकत्याच पार पडलेल्या Maharaja Trophy स्पर्धेत दमदार कामगिरी करून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी होणाऱ्या लिलावापूर्वी फ्रँचायझींना आपला दम दाखवला आहे.
Karun Nair
Karun Nairesakal
Updated on

IPL 2025 Auction Karun Nair: महाराजा ट्रॉफी स्पर्धेचं तिसरं पर्व रविवारी पार संपलं.. मैसूर वॉरियर्सने जेतेपद पटकावताना अंतिम सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सचा पराभव केला आणि स्पर्धा इतिहासात पहिल्यांचा ही ट्रॉफी जिंकली. कर्णधार करुण नायरचा या संपूर्ण स्पर्धेत दबदबा दिसला. त्याने या पर्वात सहा अर्धशतकी खेळी करताना अनेक विक्रमांची नोंद केली. IPL 2025 साठी होणाऱ्या ऑक्शनपूर्वी करूण नायरने ५६च्या सरासरीने ५६० धावांची खेळी केली. नायरने या खेळीत मंगळुरू ड्रॅगन्सविरुद्ध ४८ चेंडूंत नाबाद १२४ धावांची सर्वोत्तम खेळी नोंदवली. या स्पर्धेतील ही फलंदाजाची सर्वोत्तम खेळी ठरली.

एका पर्वात सर्वोत्तम धावा...

महाराजा ट्रॉफीच्या एका पर्वात सर्वाधिक ५६० धावांचा विक्रम करुण नायरने पुन्हा आपल्या नावावर नोंदवला. मागील पर्वात त्याने ५३२ धावा केल्या होत्या. यानंतर अभिनव मनोहर ( ५०७ धावा, २०२४) आणि मयांक अग्रवाल ( ४९६ धावा, २०२२) यांचा क्रमांक येतो.

Karun Nair
तुझी कामगिरीच बोलकी असायला हवी! Samit Dravid ला राहुलने दिला होता सल्ला

सर्वाधिक चौकार

महाराजा ट्रॉफीच्या या पर्वात करुण नायरने सर्वाधिक ५८ चौकार मारले. २०२३ मध्ये त्याने ५२ चौकार खेचून मयांक अग्रवालचा २०२२ चा ५१ चौकारांचा विक्रम मोडला होता. याच पर्वात लव्हनिथ सिसिदीयाने ५१ चौकार खेचले होते.

karun Nair
karun Nairesakal

सर्वाधिक चौकार-षटकार

करुण नायरने महाराजा ट्रॉफीच्या या पर्वात एकूण ८८ चौकार व षटकार खेचले आणि स्वतःचाच २०२३ चा ७३ चौकार-षटकारांचा विक्रम मोडला. २०२२ मध्ये मयांक अग्रवालने ७२, २०२४ मध्ये अभिनव मनोहरने ७१ व २०२३ मध्ये मोहम्मद तहाने ७१ चौकार-षटकार खेचले होते.

महाराजा ट्रॉफीच्या एका पर्वात सर्वाधिक ५०+ धावांची खेळीच्या विक्रमात करुण नायर आणि अभिमन मनोहर ( ६ ) हे बरोबरीवर आहेत. या दोघांनी मोहम्मद तहाने २०२३ मध्ये केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली.

karun Nair
karun Nairesakal

सर्वोत्तम वैयक्तिक खेळी...

महाराजा ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम करुण नायरच्या ( १२४* वि. मंगळुरू ड्रॅगन्स) नावावर नोंदवला गेला आहे. २०२२ मध्ये रोहन पाटीलने मैसूर वॉरियर्सविरुद्ध नाबाद ११२ धावा केल्या होत्या.

karun Nair
karun Nairesakal

सर्वाधिक चौकार..

करुण नायरने मंगळुरू ड्रॅगन्सविरुद्ध २२ चौकार खेचले आणि एका सामन्यातील हे सर्वाधिक चौकार आहेत. त्याने रोहन पाटीलचा १८ चौकारांचा ( वि. मैसूर वॉरियर्स) विक्रम मोडला.

karun Nair
karun Nairesakal

सामन्यात सर्वाधिक षटकार...

करुण नायरने एका सामन्यात सर्वाधिक ९ षटकारांचा विक्रमही नावावर केला. मंगळुरु ड्रॅगन्सविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता. अभिनव मनोहरने या पर्वात ( वि. हुबळी टायर्ग व वि. गुलबर्गा मिस्टीस) दोनवेळा सामन्यात ९ षटकार खेचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.