Kieron Pollard Leaves PSL : टी-20 लीगच्या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही अनेक खेळाडूंना वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेताना पाहिले असेल. यामध्ये खेळाडू अनेकदा इमर्जन्सीमुळे ब्रेक घेताना दिसतात, पण तुम्ही एखाद्या खेळाडूला एखाद्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी लीगमधून ब्रेक घेताना पाहिले आहे का? कदाचित नाही. पण वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने ब्रेक घेतला आहे.
पोलार्ड सध्या पाकिस्तान सुपर लीगचा एक भाग आहे, परंतु अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याने लीगमधून काही दिवस विश्रांती घेतली आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये होत आहे.
पीएसएल सोडून पोलार्ड गेल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'पीएसएलची हीच लायकी आहे. किरॉन पोलार्डने अंबानींच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पीएसएल सोडले. तर एका यूजरने लिहिले की, 'पोलार्डची निष्ठा MI कडे आहे' दुसरा यूजर लिहितो की, 'पीएसएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक विदेशी खेळाडूला अंबानींनी आमंत्रित करायला हवे होते. मग मजा आली असती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरॉन पोलार्ड पुढील 4 दिवस जामनगरमध्ये राहणार आहे. यानंतर तो पुन्हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जमध्ये सामील होईल. परंतु दरम्यानच्या काळात होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. किरॉन पोलार्ड आयपीएल 2010 ते आयपीएल 2022 मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यामुळे अंबानी कुटुंब आणि किरॉन पोलार्ड यांचे नाते खूपच घट्ट आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग सोडून जामनगरला पोहोचला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, डीजे ब्रावो आणि राशिद खान सारखे क्रिकेटर पोहोचले होते. सूर्यकुमार यादव पत्नी देविका शेट्टीसोबत दिसला. तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान पत्नीसोबत दिसला. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.