Saina Nehwal: सायनाच्या वक्तव्यावर KKR च्या युवा क्रिकेटरची वादग्रस्त कमेंट अन् मग मागावी लागली माफी, नक्की भानगड काय?

Angkrish Raghuvanshi: सायना नेहवालने क्रिकेटबाबत केलेल्या एका वक्तव्यावर कोलकाता नाईट रायडर्सच्या युवा क्रिकेटपटूंने वादग्रस्त कमेंट केली होती, ज्यावर त्याला माफी मागावी लागली आहे.
Angkrish Raghuvanshi | Saina Nehwal
Angkrish Raghuvanshi | Saina NehwalSakal
Updated on

Angkrish Raghuvanshi Apologises Saina Nehwal: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार क्रिकेटपटू अंगक्रिश रघूवंशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सायना नेहवालच्या वक्तव्यावर वादग्रस्त कमेंट केली होती, ज्यावर त्याला नंतर माफीही मागावी लागली आहे.

झाले असे की सायना नेहवालने असं म्हटलं होतं की बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल असे खेळ खेळणारे खेळाडू शारिरीकदृष्ट्या क्रिकेटपटूंपेक्षा अधिक कठीण असावे लागते. त्यावरच रघुवंशीने कमेंट केली होती.

त्याने कमेंट केली होती की 'बुमराहच्या ताशी १५० किमी वेगवान चेंडू जेव्हा डोक्यावर येतो, तेव्हा ती कसा सामना करते पाहू.'

Angkrish Raghuvanshi | Saina Nehwal
KKR: 'तू टेन्शन घेऊ नको आपण...', BCCI ने बंदी घातल्यानंतर शाहरुखने काय केलेलं प्रॉमिस? हर्षित राणाचा खुलासा

मात्र, त्याच्या या कमेंट्सवर त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने ही कमेंट डिलिट केली असून त्यावर स्पष्टीकरण देत माफीही मागितली आहे.

त्याने माफी मागताना लिहिले, 'मी सर्वांची माफी मागतो. माझी कमेंट फक्त एक मस्करी होती, पण मी जेव्हा त्या कमेंटचा पुन्हा विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की ती बालिश मस्करी होती. मला माझी चूक लक्षात आली आहे आणि मी खरंच माफी मागतो.'

काय म्हणालेली सायना?

सायना एका पॉडकास्टमध्ये म्हणाली होती, 'आज लोकांना माहित आहे की सायना काय करते, विनेश काय करते, मीराबाई चालू काय करते, नीरज काय करतो, कारण आम्ही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही चर्चेत राहिलो म्हणून लोकांना आम्ही माहित आहोत. मी जे केले ते कधी-कधी स्वप्नवत वाटते. मी भारतात राहून सर्व करून दाखवले आहे, या देशात क्रीडा संस्कृती नाहीये.'

Angkrish Raghuvanshi | Saina Nehwal
IPL 2025: द्रविड नाही, तर 'हा' महान अष्टपैलू घेणार गौतम गंभीरची जागा? KKR संघात होणार बदल

ती पुढे म्हणाली, 'कधी-कधी आम्हाला वाईट वाटते की क्रिकेटला खेळाकडे अधिक लक्ष दिले जाते. क्रिकेटबद्दल माझं एक मत आहे, जर तुम्ही बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि नक्कीच अन्य खेळांना पाहिले तर ते अधिक कठीण आहेत.'

'तुम्हाला शटल उचलून सर्व्ह करायलाही वेळही नसतो. तुम्हाला २० सेकंदमध्ये शटल उचलून सर्व काही करायचे असते आणि त्यावेळी तुम्ही जोर-जोरात श्वास घेत असता. क्रिकेटसारख्या खेळाकडे जास्त लक्ष वेधलं जातं, जिथं कौशल्य महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.'

अंगक्रिशचं आयपीएल पदार्पण

अंगक्रिशने आयपीएल २०२४ मधून पदार्पण केलं होतं. त्याने १० सामन्यांत १५५.२४ च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या होत्या.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.