KL Rahul ने गरजू मुलांसाठी जमवले १.९३ कोटी; विराटची जर्सी सर्वात महागडी, रोहितची बॅट...

KL Rahul raised funds for Vipla Foundation: लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी विप्ला फाऊंडेशनला निधी मिळवून देण्यासाठी भारताच्या स्टार खेळाडूंच्या क्रिकेटच्या काही वस्तूंचा आज लिलाव केला.
KL Rahul & Athiya Shetty
KL Rahul & Athiya Shettyesakal
Updated on

KL Rahul-Athiya Shetty Virat Kolhi Jersey: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल याने अखेर मोठी बातमी दिलीच... काल लोकेशने इंस्टा पोस्टवर मोठ्या बातमीसाठी सज्ज राहा असे लिहिले होते. त्यानंतर त्याच्या निवृत्तीची Fake पोस्ट व्हायरल केली गेली. पण, आज अखेर मोठी बातमी समोर आलीच... लोकेश राहुल व त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी विप्ला फाऊंडेशनला निधी मिळावा यासाठी लिलाव आयोजित केला होता. या लिलावात क्रिकेटपटूंच्या काही क्रिकेटींग वस्तूंवर बोली लावली गेली.

लोकेश-अथिया यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. या लिलावात राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आदी खेळाडूंच्या क्रिकेटींग वस्तू लिलावासाठी ठेवल्या गेल्या होत्या. जोस बटलर, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन या परदेशी खेळाडूंनीही यात योगदान दिले.

राहुल म्हणाला होता की,“शाळेला माझी पहिली भेट खूप भावनिक होती आणि मुलांनी मला व अथियाला या उपक्रमात योगदान देण्यासाठी प्रेरित केले. लिलाव हा विप्ला फाऊंडेशन या मुलांना शिकण्याचे उत्तम वातावरण देण्यासाठी अतुलनीय कार्य करते.”

Virat Kohli Jersey
Virat Kohli Jerseyesakal

लिलावात विराटला डिमांड...

लोकेश राहुल व अथिया शेट्टी यांनी आज BKC मध्ये पार पडलेल्या लिलावातून १.९३ कोटी रुपये जमा केले. यात विराट कोहलीची जर्सी सर्वात महाग ठरली.

  • विराट कोहली जर्सी - ४० लाख

  • विराट कोहली ग्लोव्ह्ज - २८ लाख

  • रोहित शर्मा बॅट - २४ लाख

  • महेंद्रसिंग धोनी बॅट - १३ लाख

  • राहुल द्रविड बॅट - ११ लाख

  • लोकेश राहुल जर्सी - ११ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.