IPL 2024 KL Rahul Fitness Update News : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आधी लखनऊ सुपर जायंट्ससाठी केएल राहुलची फिटनेस चिंतेचा विषय बनला आहे. पण, दरम्यान, त्याच्या फिटनेसशी संबंधित एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, केएल राहुलला लवकरच एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळणार आहे. यानंतर तो आपल्या संघात सामील होऊन सराव सुरू करू शकेल. केएलसाठी हे आयपीएल महत्त्वाची असणार आहे, कारण येथील कामगिरी वरून तो आगामी टी-20 वर्ल्ड कप संघासाठी आपला दावा मांडू शकतो.
केएल राहुलच्या फिटनेसबद्दल अपडेट
केएल राहुलच्या फिटनेसच्या ताज्या अपडेटनुसार तो लवकरच मैदानात परतू शकतो. रिपोर्टनुसार, केएल राहुलने त्याच्या दुखापतीबाबत लंडनमधील उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. तो रविवारी भारतात परतला आणि त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू केले. लवकरच त्याला एनसीएकडून खेळाचे प्रमाणपत्र मिळू शकते. आयपीएलमध्ये कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.
केएल राहुल कधी झाला जखमी?
गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्या गेलेल्या आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला दुखापत झाली होती. यानंतर तो परतला आणि आशिया कप-वर्ल्ड कप 2023 मध्ये कामगिरी केली. तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही गेला होता.
त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळला. पण, फिटनेसशी संबंधित कारणांमुळे तो उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. आता लखनऊ सुपर जायंट्सला आशा आहे की त्यांचा कर्णधार केएल लवकरच तंदुरुस्त होईल आणि संघाची कमान सांभाळेल.
आयपीएल 2024 मधील लखनऊ सुपर जायंट्स संघ -
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, के.गौतम, कृणाल पांड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, शिवम मावी, एम सिद्धार्थ, अर्शिन कुलकर्णी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.