IPL 2025 Auction: KL Rahul लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडणार? अचानक घेतली मालक संजीव गोएंका यांची भेट

KL Rahul leave LSG? भारताचा मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल याने आज जवळपास तासाभरापूर्वी संजीव गोएंका यांची भेट घेतली. तो LSG सोडणार असल्याच्या चर्चा आहेत.
KL Rahul LSG
KL Rahul LSGesakal
Updated on

KL Rahul meets LSG owner Sanjiv Goenka: ''आयपीएलमधील संघमालक बिझनेस बॅकग्राऊंडचे असतात. संघातील खेळाडूंना निवडण्यासाठी ते पूर्ण रिसर्च करतात, पण त्यामुळे तुम्ही ही खात्री देऊ शकत नाही की तुम्ही प्रत्येक सामना जिंकालच,'' लोकेश राहुलने नुकत्याच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं होतं. लोकेश राहुल आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघमालक संजीव गोएंका यांच्यात मागील पर्वात खटके उडाल्याचे सर्वांनी पाहिले. त्यानंतर लोकेशचे हे विधान भुवया उंचावणारे नक्की ठरले होते. त्यात आज लोकेशने तासाभरापूर्वी LSG मालक गोएंका यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी ऑक्शन होणार आहे आणि फ्रँचायझींना प्रत्येकी ६ खेळाडू संघात कायम राखण्याची परवानगी BCCI कडून मिळण्याची शक्यता आहे. अशात बरेच मोठे खेळाडू अन्य संघात जातील अशा अफवा सुरू आहेत. लोकेश राहुलही त्याचा माजी संघ RCB च्या ताफ्यात दाखल होईल, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलने फ्रँचायझीच्या कोलकाता येथील कार्यालयात भेट दिली. तेथे त्याने मालक संजीव गोएंका यांची भेट घेतली.

KL Rahul LSG
Virat Kohli UK Citizen: विराटने ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्यास, तो IPL मध्ये परदेशी खेळाडू म्हणून खेळणार का?

आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर गोएंकाने लाईव्ह कॅमेरात लोकेशला झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ही दोघं प्रथमच भेटली आहेत. क्रिक बजने हे वृत्त दिले आहे. पण, या बैठकीत नेमके काय घडले हे अद्याप समोर आलेले नाही. पण, या बैठकीत आगामी लिलावात कोणाला रिटेन करायचे आणि काय रणनीती आखायची यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. फ्रँचायझी लोकेश राहुलला संघात कायम राखण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु लोकेशकडून अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.

BCCI ने अद्याप त्यांची रिटेंशन पॉलिसी जाहीर केलेली नाही. लखनौ सुपर जायंट्स मेंटॉर म्हणून झहीर खानच्या नावाचा विचार करत आहे आणि त्यादृष्टीने राहुलची भेट असल्याचीही चर्चा आहे. राहुल मागील तीन पर्व LSG सोबत आहे.

KL Rahul LSG
हा इकडे, तो तिकडे! IPL 2025 पूर्वी अफवांचा सुळसुळाट; सूर्या, रोहित यांचेही त्यात नाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.