Faf du Plessis उचलबांगडी? RCB च्या ताफ्यात IPL 2025 पूर्वी मेजर बदल; ६ रिटेन खेळाडू जवळपास पक्के

KL Rahul Captain IPL 2025 RCB: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सर्व फ्रँचायझींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. कर्णधारपदावरही खांदेपालट झालेली दिसल्यास आश्चर्य वाटायला नको..
KL Rahul Virat Kohli RCB
KL Rahul Virat Kohli RCBesakal
Updated on

RCB IPL 2025 KL Rahul Virat Kohli: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी फ्रँचायझींनी जोरदार तयारी केली आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी मागील पर्वात चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत होती. रोहित शर्माला हटवून त्यांनी हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिल्याने चाहते प्रचंड नाराज झाले होते. आता आणखी काही फ्रँचायझींमध्ये आयपीएल २०२५ मध्ये खांदेपालट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळताना दिसू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये समाधानकारक कामगिरी करता आली. त्यांना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आणि आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न आणखी एक पर्व अधुरं राहिलं. आता IPL 2024 Mega Auction पूर्वी फ्रँचायझींना ६ खेळाडू रिटेन करण्याची मुभा BCCI ने दिल्याचे समजतेय आणि RCB ची ही लिस्ट जवळपास निश्चित आहे.

KL Rahul Virat Kohli RCB
बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी Rohit Sharma, Virat Kohli हे मोठा निर्णय घेणार, चाहते...

RCB या सहा खेळाडूंना रिटेन करणार?

विराट कोहली, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, यश दयाल, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल

फॅफ ड्यू प्लेसिस किंवा कॅमेरून ग्रीन यांना स्थान नाही?

फॅफ ड्यू प्लेसिसने मागील तीन पर्व RCB चे नेतृत्व सांभाळले. जरी त्याने फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली असली, तरी तो संघाचा जेतेपदाचा दुष्काळ संपवू शकला नाही. IPL 2022 ते IPL 2024 या कालावधीत त्याने अनुक्रमे ४६८, ७३० व ४३८ धावा केल्या आहेत. पण, त्याच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित होत आहेतच. त्यामुळे IPL 2025 मध्ये त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले जाईल अशी चर्चा आहे. त्यामागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे KL Rahul ची बंगळुरूच्या ताफ्यात होणारी एन्ट्री...

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आयपीएलच्या पुढील पर्वात RCB च्या ताफ्यात येईल अशी चर्चा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली LSG ची कामगिरी चांगलीच झाली होती आणि RCB त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा अंदाज आहे. RCB ने मोठी रक्कम देऊन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला संघात घेतले, परंतु त्याला त्या तोडीची कामगिरी करून दाखवता आली नाही. त्यामुळे त्याला रिलीज केले जाऊ शकते, जेणेकरून फ्रँचायझीच्या पर्समधील रक्कम वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.