तयारी पुनरागमनाची! KL Rahul श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी गाळतोय घाम, Video Viral

KL Rahul Batting Practice Ahead of Sri Lanka Tour: केएल राहुल श्रीलंका दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. त्याआधी त्याने जोरदार सराव केला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
KL Rahul Batting Practice
KL Rahul Batting PracticeSakal
Updated on

KL Rahul Video: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याची श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

भारतीय संघाला २७ जुलैपासून श्रीलंका दौऱ्यात ३ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मात्र केएल राहुलला टी२० मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही.

तो त्याआधी पार पडलेल्या टी२० वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघात नव्हता. असंही समजत आहे की यापुढे त्याचा टी२० क्रिकेटसाठी भारतीय संघात विचार होण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र वनडे संघातील तो प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

दरम्यान, २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्याने नेटमध्ये जोरदार सराव केला आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक १४ सेंकदाचा व्हिडिओ सोशल माडियावर शेअर केला आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

KL Rahul Batting Practice
Women's Asia Cup: शिक्कामोर्तब झालं! भारतासह हे तीन संघ खेळणार सेमीफायनल, पाहा संपूर्ण शेड्युल

केएल राहुल जानेवारी २०२४ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळणार आहे. तो अखेरचे भारताकडून इंग्लंडविरुद्ध हैदराबाद कसोटीत खेळला होता. तर तो अखेरचा वनडे सामना डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

तो या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताचा कर्णधारही होता, ज्यात २-१ अशा फरकाने भारताने विजय मिळवला होता. केएल राहुलसाठी २०२३ वर्ल्डकपही चांगला राहिलेला. त्याने जवळपास ७५ च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ४५२ धावा केल्या होत्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की श्रीलंका दौऱ्यात केएल राहुलसह ऋषभ पंतही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार की एकाला बेंचवर बसायला लागणार हे पाहावे लागेल.

KL Rahul Batting Practice
IND vs SL: Hardik Pandya ची सराव सत्रात सहाय्यक प्रशिक्षकासोबत हुज्जत, वाद मिटवण्यासाठी पत्रकाराची मदत

तसेच केएल राहुल आणि ऋषभ पंत दोघांना संधी दिल्याने संजू सॅमसनला वनडे संघात निवडता आले नसल्याचे निवड समिती अध्यक्ष आगरकर यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी सांगितले होते की केएल राहुलची वनडेतील कामगिरी चांगली आहे.

तसेच असेही काही मिडिया रिपोर्ट्स समोर आले होते की रोहित शर्माने पसंती दिल्याने ऋषभ पंतला वनडे संघात निवडण्यात आले. त्यामुळे सॅमसनला श्रीलंकेविरुद्ध केवळ टी२० संघात जागा मिळाली.

याशिवाय आणखी एक गोष्ट या श्रीलंका दौऱ्यात पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे केएल राहुल आणि गौतम गंभीर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

आयपीएलमध्ये २०२२ आणि २०२३ हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून या दोघांनी एकत्र काम केले आहे. या दोन्ही हंगामात लखनौचा केएल राहुल कर्णधार होता, तर गंभीर मेंटॉर होता. आता गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.