How much money BCCI pay as taxes for IPL? इंडियन प्रीमिअर लीगमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वर्षाला कोट्यवधींची कमाई करतो. ऑक्शन, स्पॉन्सरशीप, तिकिट्स, ब्रॉडकास्टींग आणि प्रक्षेपण हक्क अशा अनेक माध्यमातून BCCI करोडो रुपये कमावतात. पण, IPL च्या उत्पन्नावर बीसीसीआय टॅक्स किती भरते हे तुम्हा माहित आहे का? किंवा हे उत्पन्न टॅक्स फ्री आहे का? चला जाणून घेऊयात...
बीसीसीआयने आयपीएल २०२३ मधून जवळपास ५,१२० कोटी अतिरिक्त कमाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. आयपीएल २०२२च्या तुलनेत ११६ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे समोर येत आहे. आयपीएल २०२३ मधून बीसीसीआयची एकूण कमाई ७८% जास्त झाली असून हा आकडा ११,७६९ कोटींपर्यंत गेला आहे. BCCI च्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार एकूण खर्च ६६% वाढून ६,६४८ कोटी झाला असल्याचे समोर आले आहे.
आयपीएल संस्था लीगसाठी कोणताही कर भरत नाही. २०२१ मध्ये Income Tax Appellate Tribunal (ITAT ) ने BCCI दाखल केलेल्या अपीलमध्ये क्रीडा संस्थेच्या युक्तिवादांचे समर्थन दिले. आयपीएलच्या माध्यमातून जरी BCCI पैसे कमावत असतील, तरी त्याचा वापर ते क्रिकेटला चालणा देण्यासाठी करतात आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाला करमुक्त केले पाहिजे, असे त्यात म्हटले गेले. न्यायाधिकरणाने २ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशात हा निर्णय आला.
त्यामुळे जोपर्यंत आयपीएलमधून होणारा नफा BCCI च्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशासाठी वापरला जातो, तोपर्यंत थेट कायद्यानुसार त्यांना करात सूट मिळण्याचा हक्क आहे. पण, आयपीएलमधून खेळाडूंना मिळणारे उत्पन्न करास पात्र आहे.
बीसीसीआयला २०१६-१७ मध्ये महसूल विभागाने तीन कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. आयकर कायद्याच्या कलम १२ अ अंतर्गत BCCI ने आयकर अपील न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे दाद मागितली.
महसूल विभागाचा युक्तिवाद न्यायिक सदस्य रवीश सूद आणि उपाध्यक्ष प्रमोद कुमार यांच्या खंडपीठाने फेटाळला. त्यांनी सांगितले की, “क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे त्यांना अधिक प्रायोजकत्व आणि संसाधनांची जमवाजमव होते, परंतु त्यातून क्रिकेटला लोकप्रिय बनवण्याचे मुळ हेतू नष्ट होत नाही.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.