IND vs PAK T20 WC 2024 Ticket : ललित मोदीलाही महागाईची झळ? भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचा दर पाहून संतापला

India vs Pakistan Tickets Rate : भारत अन् पाकिस्तान सामन्यातील तिकिटाचे दर दसपटीनं वाढले असून ललित मोदीने अमेरिकेत क्रिकेटचं प्रमोशन करण्यावर याचा नक्की परिणाम होईल अशी चिंता बोलून दाखवली.
Lalit Modi
IND vs PAK T20 WC 2024 Ticket esakal
Updated on

IND vs PAK T20 WC 2024 Ticket : टी 20 वर्ल्डकप 2024 ची सुरूवात 1 जून पासून होत आहे. यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा युएसए आणि वेस्ट इंडीज येथे खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघाचे जवळपास सर्व सामने हे युएसएमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात 9 जूनला हाय व्होल्टेज लढत होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. या भागात भारतीय आणि पाकिस्तानी मूळ असलेले अनेक लोक राहतात.

दरम्यान, आयपीएलचा फाऊंडर मेंबर अन् पहिला चेअरमन ललित मोदीलाने या सामन्याच्या तिकीट दरावरून आगपाखड केली आहे. ललित मोदी हा आपल्या आलीशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. मात्र त्यानंही भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचा दर पाहून डोक्याला हात लावला.

Lalit Modi
SRH vs RR Qualifier 2 : ध्रुव जुरेलची झुंज अपयशी; हैदराबादनं तिसऱ्यांदा गाठली आयपीएलची फायनल

भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान डायमंड क्लब सीटचे तिकीटाचे दर हे 20,000 अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचले आहेत. याची भारतीय चलनात किंमत ही 16.6 लाख इतकी आहे. मोदीने आयसीसीवर आगपाखड करत यामुळं सामन्याच्या प्रसिद्धीवर मोठा परिणाम होईल अशी भीती देखील व्यक्त केली. आयसीसी टी 20 वर्ल्डकप हा युएसएमध्ये आयोजित करण्याचा मुख्य उद्येश हा क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार व्हावा हा आहे.

जर सामन्यांच्या तिकीटांचे दर जर इतके उच्च असतील तर या उद्येशाला हरताळ फासली जाईल असं मत ललीत मोदीने व्यक्त केलं. भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची मागणी प्रचंड असल्याने त्याचे दर जवळपास दसपटीने वाढले आहेत.

भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांविरूद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. त्यांनी 2013 पासून एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. त्यामुळे आयसीसी आणि एशिया कपमधील भारत - पाकिस्तान सामन्याला मोठी डिमांड येते.

Lalit Modi
Pakistan Cricket Team : पीसीबी प्रमुखांना संघ आवडलाच नाही! पाकिस्तानची संघ जाहीर करण्यास टाळाटाळ

2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात देखील स्टेडियम खचाखच भरलं होतं. त्यानंतर भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील भारत - पाकिस्तान सामन्यावेळी स्टेडियमवर पूर्ण पॅक होतं.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.