WTC Points-Table: पाकिस्तानची हार, पण बांगलादेशने वाढवले 3 तगड्या संघांचे टेन्शन; भारत...

Pakistan vs Bangladesh: पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत मिळवलेल्या विजयामुळे बांगलादेशला टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्सटेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.
Bangladesh Cricket Team
Bangladesh Cricket TeamSakal
Updated on

Pakistan vs Bangladesh Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात रावळपिंडी येथे कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (४ सप्टेंबर) बांगलादेशने ६ विकेट्सने जिंकला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत २-० असा विजय मिळवला.

बांगलादेशसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला. त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. इतकेच नाही, तर या विजयामुळे बांगलादेशला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही मोठा फायदा झाला आहे.

बांगलादेश या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची विजयी टक्केवारी ४५.८३ अशी आहे.

Bangladesh Cricket Team
PAK vs BAN 2nd Test: पाकिस्तानच्या घरात घुसून बांगलादेशचा 'नागिण डान्स'! कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.