मिचेल स्टार्कविरुद्ध लिव्हिंगस्टोनचा रुद्रावतार! एकाच ओव्हरमध्ये २८ धावा ठोकत झळकावलं विक्रमी अर्धशतक

ENG vs AUS 4th ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यामध्ये इंग्लंडने १८६ धावांनी बाजी मारली आहे.
Liam Livingstone
Liam Livingstoneesakal
Updated on

Massive knock by Liam Livingstone: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या वन-डे मालिकेतील चौथा सामना इंग्लंडने आपल्या नावे केला आहे. सुरवातीच्या २ सामन्यांमध्ये मिळालेल्या पराभवानंतर पुनरागमन करत इंग्लंडने सलग दोन सामने जिंकले आहेत.

चौथ्या सामन्यामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियम लिव्हिंगस्टोनकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. या खेळी दरम्यान लिव्हिंगस्टोनने एका डावात ७ षटकार ठोकत नवा विक्रम रचला आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने सुंदर सुरुवात केली. सलामीवीर बेन डकेटने ६२ चेंडूत ६३ धावा करत अर्धशतक झळकावले, तर हॅरी ब्रूकने ५८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार व ११ चौकार लगावले.

Liam Livingstone
SL vs NZ 2nd Test : न्यूझीलंड ८८ धावांत तंबूत, श्रीलंकेकडे ५०० पार आघाडी; Prabath Jayasuriya ची आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

परंतु, ३१ व्या षटकात ॲडम झॅम्पाने ब्रूकला माघारी पाठवल्यावर दुखापतग्रस्त बटलरच्या जागी संघामध्ये खेळणारा लिव्हिंगस्टोन फलंदाजीसाठी आला. लिव्हिंगस्टोनने अवघ्या २५ चेंडूमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. तो २७ चेंडूत ६२ धावा करत नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार व ७ षटकार ठोकले.

या सात षटकारांसह त्याने लॉर्ड्सवर एका डावात सर्वाधिक षटकार मारण्यात आंद्रे फ्लिंटॉफच्या विक्रमाची बरोबरी केली, तर १२ षटकार मारून लॉर्ड्सवर एका वनडे डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रमही इंग्लंडने प्रस्थापित केला.

Liam Livingstone
Viral Video: विराट-जड्डूची मैदानात मस्ती! बुमराहसमोर केली त्याचीच नक्कल अन् मग...

लिव्हिंगस्टोनची तुफान फटकेबाजी

लिव्हिंगस्टोनने शेवटच्या षटकात एकूण २८ धावा केल्या. ज्यामधे सुरुवात त्याने षटकारने केली. परंतु, दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला यश आले. नंतर त्याने तिसरा चेंडू डाव्या बाजूला, तर चौथा चेंडू समोरच्या दिशेस टोलवला. पाचव्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलेला फटका सीमापार झाला आणि षटकाचा शेवट त्याने चौकराने केला.

या सामन्यात इंग्लंडने ३९ षटकांमध्ये एकूण ३१२ धावा उभारल्या, तर ऑस्ट्रेलियाचा डाव १२६ धावांवर गुंडाळत सामना १८६ धावांनी आपल्या नावे केला. सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकीय खेळी करता आलेली नाही, तर इंग्लंडचा वेगवान फलंदाज मॅथ्यू पॉट्सला ऑस्ट्रेलियाचे ४ विकेट्स घेण्यात यश आले. ब्रायडन कार्सने ३ विकेट्स घेतले. तर जोफ्रा आर्चर २ आणि आदिल रशीदला १ विकेट मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.