PAK vs NZ: पाकिस्तानचा मायदेशात लाजीरवाणा पराभव पाहून चिमुकल्या फॅनलाही आवरले नाहीत अश्रू, Video Viral

Pakistan Cricket Fan Viral Video: पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवानंतर स्टेडियममधील छोट्या फॅनलाही रडू आवरता आले नाहीत.
Pakistan Cricket Fan
Pakistan Cricket FanSakal
Updated on

Pakistan Cricket Fan Viral Video: एकीकडे आयपीएल 2024 स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेत त्यांची फारशी चांगली कामगिरी झालेली नाही.

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. मात्र, यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागल्याने 5 सामन्यांची टी20 मालिका मायदेशात जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

यानंतर एक लहान फॅन त्यांच्या पराभवामुळे निराश होऊन रडतातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तान - न्यूझीलंड संघातील चौथा टी20 सामना लाहोरला गुरुवारी पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानला 18 धावांची गरज होती.

Pakistan Cricket Fan
Krunal Pandya Son: कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला 'बाबा', मुलाच्या नावाचाही केला खुलासा

अखेरच्या षटकात पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर चौकारही आले होते. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना इमाद वासिमला एकच धाव काढता आली. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली.

दरम्यान, पाकिस्तानच्या या विजयानंतर गद्दाफी स्टेडियमवर निराशा पसरली होती. याचवेळी एक लहान फॅनही रडताना दिसून आले. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडने चौथा सामना जिंकल्याने मालिकेतील पराभव टाळला असून आता त्यांना मालिका जिंकण्याची संधी आहे. जर 27 एप्रिलला होणारा सामना न्यूझीलंडने जिंकला, तर ते मालिकात 3-1 फरकाने जिंकतील, पण जर हा सामना पाकिस्तानने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल.

Pakistan Cricket Fan
T20 World Cup: '...तर दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी देण्यात अर्थ नाही,' वर्ल्ड कप अँबेसिडर युवराज असं का म्हणाला?

चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव

चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर टीम रॉबिन्सनने 51 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून अब्बास आफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 174 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून फखर जमानने 61 धावांची खेळी केली. परंतु, बाकी कोणाला खास काही करता आले नाही. न्यूझीलंडकडून विल्यम ओरोर्केने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.