Legends League Cricket 2024 Auction : भारतीय संघाचा गब्बर शिखर धवन पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवतान दिसणार आहे. Shikhar Dhawan याने नुकतीच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण, आता तो लिजंड्स लीग क्रिकेट २०२४ मध्ये खेळताना दिसणार आहे. गुजरात फ्रँचायझीकडून तो युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच्यासोबत खेळणार आहे. LLC च्या तिसऱ्या पर्वासाठी काल ऑक्शन झाले आणि त्यात भारताचा माजी गोलंदाज धवल कुलकर्णी हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये प्रत्येक फ्रँचायझीला लिलावासाठी ८ कोटी रुपयांची मर्यादा दिली गेली होती. दिनेश कार्तिक आणि शिखर या माजी खेळाडूंना अनुक्रमे साऊदर्न सुपरस्टार व टीम गुजरात यांनी थेट संघात दाखल करून घेतले. इसुरू उदाना याच्यासाठी अर्बनाझर्स हैदराबादने ६१.९७ लाख मोजले, तर याच फ्रँचायझीने चॅडविक वॉल्टनसाठी ६०.३ लाखांची यशस्वी बोली लावली.
आक्रमक फलंदाज सॅमिउल्लाह शिनवारी याला हैदराबादने १८.५८५ लाख दिले. हैदराबादने सर्व आक्रमक फलंदाजांना आपल्या ताफ्यात घेऊन त्यांचा इरादा स्पष्ट केला. ड्वेन स्मिथसाठी कॅपिटल्सने ४७.३६ लाख मोजले. भारतीय फिरकीपटूंमध्ये प्रविण गुप्ताला ५ लाखांच्या मुळ किमतीपासून ४८ लाख मिळाले आणि मनिपाल टायगर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. भारतीय खेळाडूंमध्ये धवल कुलकर्णी ( ५० लाख) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. इंडिया कॅपिटल्सने त्याला संघात घेतले.
२० सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. यामध्ये भारताच्या व आंतरराष्ट्रीय माजी स्टार खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
Konark Suryas Odisha: इरफान पठाण ( RTM), युसूफ पठाण ( RTM), केव्हीन ओब्रेर ( २९.१७ लाख). रॉस टेलर ( ५०.३४ लाख), विनय कुमार ( ३३ लाख), अंबाती रायुडू ( आयकॉन)
Gujarat Team: ख्रिस गेल ( RTM), लिएम प्लंकेट ( ४१.५६ लाख), लेंडल सिमन्स ( ३७.५६ लाख), मोहम्मद कैफ ( आयकॉन), एस श्रीसंथ ( आयकॉन), शिखर धवन ( डायरेक् एन्ट्री)
India Capitals: अॅश्ली नर्स ( RTM), बेन डंक ( RTM), ड्वेन स्मिथ ( ४७.३६ लाख), मुरली विजय ( आयकॉन), इयान बेल ( डायरेक्ट सायनिंग).
Southern Superstars: अब्दुर रज्जाक ( RTM), हॅमिल्टन मसाकाड्जा ( २३.२८ लाख), केदार जाधव, पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक
Manipal Tigers: हरभजन सिंग ( RTM), रॉबिन उथप्पा ( RTM), थिसारा परेरा ( RTM), शेल्टन कॉट्रेल ( ३३.५६ लाख), सौरभ तिवारी
Urbanrisers Hyderabad: सुरेश रैना ( RTM), स्टुअर्ट बिन्नी ( ४० लाख), चॅडविक वॉल्टन ( ६०.३ लाख)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.