Rohit Sharma येत असेल तर...! ५० कोटी राखून ठेवल्याच्या चर्चांवर LSG मालकांचे मोठं विधान

Rohit Sharma offer 50 cr from LSG : लखनौ सुपर जायंट्सने बुधवारी मुंबई इंडियन्सचा ग्लोबल डेव्हलपमेंटचे प्रमुख झहीर खान याला मेंटॉर म्हणून आपल्या ताफ्यात घेतले. आता रोहित शर्मासाठी ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहेत.
Rohit Sharma in LSG Camp
Rohit Sharma in LSG Campesakal
Updated on

50 crore salary package to Rohit Sharma IPL 2025 :

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी सर्व संघ तयारीला लागले आहेत आणि लखनौ सुपर जायंट्सने झहीर खान याची मार्गदर्शक म्हणून निवड काल जाहीर केली. LSG ने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला आपल्या संघात घेण्यासाठी ५० कोटी राखून ठेवल्याची चर्चा आहे. यावर मालक संजीव गोएंका यांनी मोठं विधान केलं आहे...

२०२४ मध्ये हार्दिक पांड्याला MI ने कर्णधारपद दिल्यानंतर रोहित शर्मा संघाची साथ सोडणार या चर्चा रंगू लागल्या. त्यात MI रोहितला कायम ठेवणार नाही अशीही चर्चा आहे. असे झाल्यात T20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार मेगा ऑक्शनमध्ये दिसू शकतो. हिच चर्चा लक्षात घेता लखनौ फ्रँचायझीने हिटमॅनसाठी ५० कोटी राखून ठेवल्याची अफवा पसरली आहे. यावर गोएंका यांनी काल एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं...

Rohit Sharma in LSG Camp
IPL 2025 Auction: रोहित शर्मासाठी बोली लावणार? पंजाब किंग्सचे क्रिकेट हेड काय म्हणाले वाचा

रोहित शर्मा लिलावात येतोय का?

संजीव गोएंका म्हणाले, ''रोहित शर्मा लिलावात येणार आहे का? हे कोणालाच माहीत नाही आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे. आधी मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करतात का, ते पाहावे लागेल. जर त्यांनी हिटमॅनला रिलीज केले, तर तो लिलावात येईल की नाही? तो लिलावात आला तरी आम्ही आमच्या पर्समधील अर्धी रक्कम त्याच्यासाठी खर्च करू शकत नाही. तसे केल्यास इतर खेळाडूंचे काय होणार?

''प्रत्येक फ्रँचायझीला सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार हवा असतो. अशा परिस्थितीत आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, हे बघावे लागेल. मला खूप काही हवंय पण तुला सगळं मिळू शकत नाही,''असेही गोएंका यांनी म्हटले.

Rohit Sharma in LSG Camp
हा इकडे, तो तिकडे! IPL 2025 पूर्वी अफवांचा सुळसुळाट; सूर्या, रोहित यांचेही त्यात नाव

रोहित, सूर्याचं काय?

BCCI ने सहा खेळाडूंना रिटेन ठेवण्याचा नियम आणल्यास मुंबई इंडियन्स त्याचा फायदा नक्की उचलेल. MI रोहित, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा व टीम डेव्हिड असे सहा खेळाडू रिटेन ठेवतील. त्यामुळे रोहित व सूर्या कुठे जाणार नाही. पण, MI सोबत राहायचं की नाही हा निर्णय रोहितच्याच हाती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.