IPL Retention Plan Of LSG : आयपीएल २०२५ ची रिंटेंशन तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतशी फ्रॅंचायझींमधील अंतर्गत हालचालींनी वेग घेतला आहे. काही दिवसांपासून लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला करारमुक्त करणार आहे, अशा बातम्या समोर येत आहेत. गेल्या आयपीएल हंगामातील खराब कामगिरीमुळे राहुलला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. राहुलची मागील वर्षभरातील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील चांगली नसल्याने एलएसजी केएल राहूलला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एलएसजीचा (LSG) मार्गदर्शक झहीर खान व प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केएल राहुलच्या गेल्या हंगामातील कामगिरीचे विश्लेषण केले. आकडेवारीचा सखोल विचार केल्यानंतर असे लक्षात आले की, केएल राहुलच्या संथ खेळीमुळे संघाला अनेकदा नुकसान झाले व संघाला पराभवालाही सामोरे जावे लागले.
मार्गदर्शक झहीर खान आणि प्रशिक्षक जस्टिन लँगरसह एलएसजी व्यवस्थापनाने त्याच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यामध्ये असे दिसून आले आहे की केएलने ज्या सामन्यांमध्ये दीर्घ काळ फलंदाजी केली आणि धावा केल्या, त्यापैकी जवळपास सर्व सामने एलएसजीने गमावले आहेत. या वरून हे लक्षात येते की, केएलच्या खेळीचा, सामन्यातील धावांच्या सरासरीशी समतोल नसतो. इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे सलामीच्या फलंदाजाने सेट होण्यासाठी फार वेळ घेणे संघासाठी धोकाधायक ठरते.
वेगवान गोलंदाज मयंक यादवला एलएसजी संघात कायम ठेवेल असे अहवालात समोर येत आहेत. फ्रँचायझीकडून कायम ठेवण्यात येणाऱ्या सुरूवातीच्या ३ खेळाडूंमध्ये तो असण्याची शक्यता आहे. "मयंक हा एलएसजीने तयार केलेला खेळाडू आहे आणि तो आपल्या गोलंदाजीने सामन्यात प्रभाव पाडू लागला आहे. त्यामुळे फ्रँचायझी त्याला संघात कायम ठेवेल," असे अहवालात पुढे म्हटले आहे. आयुष बदोनी आणि मोहसिन खान यांसारख्या अनकॅप्ड खेळाडूंनाही फ्रँचायझी कायम ठेवण्याची शक्यता आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला करारमुक्त केल्यास, एलएसजी त्याला कर्णधार करण्याच्या तयारीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.