Ramakant Achrekar memorial: रमाकांत आचरेकर सरांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभं राहणार; महाराष्ट्र सरकारने दिली मान्यता

Sachin Tendulkar Coach: महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शब्द टाकला अन्...
Ramakant Achrekar memorial
Ramakant Achrekar memorialesakal
Updated on

coach Ramakant Achrekar Shivaji Park: महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या GR मध्ये शिवाजी पार्कच्या गेट ५ जवळ १.८ मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे.

या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे आणि त्यासाठी सरकारकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. शिवाजी पार्क जिमखान्याचे सहाय्यक सचिव सुनील रामचंद्रन यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. रामचंद्रन म्हणाले, “रमाकांत आचरेकर सरांनी भारताला १३ क्रिकेटपटू दिले आहेत. ते जास्त प्रसिद्धीच्या झोतात नव्हते आणि सचिन तेंडुलकर चमकला तेव्हाच त्यांना प्रसिद्धी मिळाली."

Ramakant Achrekar memorial
Ramakant Achrekar memorialesakal

ते म्हणाले, "गेल्या तीन वर्षांपासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे."

आचरेकर सरांनी चार दशकांहून अधिक काळात तेंडुलकर, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे आणि रमेश पोवार यांच्यासह असंख्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडवले.

Ramakant Achrekar memorial
Ramakant Achrekar memorialesakal

सचिन तेंडुलकर म्हणाला...

सचिन तेंडुलकरने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले की, "आचरेकर सरांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे. मी आज त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले आहे आणि ते पार्कवर कायम रहावे हिच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांचा त्यांच्या कर्मभूमीवर स्मारक उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे."

आचरेकर सर कोच म्हणून कार्यरत होण्यापूर्वी स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. मुंबई आणि इतर ठिकाणच्या प्रतिभेला हेरून त्याला पैलू पाडायचे काम ते मोठ्या आवडीने करत होते. अशातच त्यांना तेंडुलकर भेटला. अकरा वर्षांचा झाल्यावर क्रिकेटची आवड बघून त्याच्या भावाने, अजितने त्याला आचरेकर सरांकडे सोपवला. त्यावेळी आचरेकर सर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत अधिकृत क्रिकेट कोच होते. सचिनची शाळा वेगळी होती पण आचरेकर सर त्याचा खेळ पाहून प्रभावित झाले आणि त्याचे ऍडमिशन शारदाश्रम मध्ये करायला लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.