C. K. Nayudu Trophy स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर; अनिकेत नलावडे करणार नेतृत्व

Maharashtra U23 cricket team : महाराष्ट्राचा पहिला सामना त्रिपुराशी १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील मैदानावर होणार आहे.
maharashtra cricket
maharashtra cricketesakal
Updated on

Maharashtra U23 Cricket Team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व अनिकेत नलावडेकडे सोपविण्यात आले आहे. पहिल्या दोन लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्राचा पहिला सामना त्रिपुराशी (१३ ते १६ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील मैदानावर होणार आहे. दुसरा सामना ओडिशाविरुद्ध बरगार येथील विकाश मैदानावर होईल. कर्नाटकशी तिसऱ्या सामन्यात (२७ ते ३० ऑक्टोबर) बंगळुरु येथील अलूर मैदानावर, केरळविरुद्ध ( ८ ते ११ नोव्हेंबर) नाशिक येथे गोल्फ क्लब, उत्तराखंडविरुद्ध (१५ ते १८ नोव्हेंबर) रामनगरमध्ये कौशिकी क्रिकेट मैदानावर, चंडिगडविरुद्ध (२५ ते २८ जानेवारी २०२५) सोलापुरात इंदिरा गांधी मैदानावर, तर तमिळनाडूविरुद्ध १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान त्रिपुरातील त्रिपुर प्रशाला मैदानावर लढत होणार आहे.

maharashtra cricket
Women Cricket Team: महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदार

महाराष्ट्र २३ वर्षांखालील संघ :

अनिकेत नलावडे (कर्णधार), यश बोरामणी, सिद्धांत दोशी, कौशल तांबे, दिग्विजय पाटील, रोहित हडके, हर्षल काटे, अभिषेक पवार, विकी ओस्तवाल, शुभम मैड, अब्दुस सलाम, वैभव टेहाळे, रामेश्वर दौड, अजय बोरुडे, साहिल औताडे, श्रेयस चव्हाण.-

महाराष्ट्र १९ वर्षांखालील मुलींचा संघ:

नागपूर येथे झालेल्या बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत ‘ड’ गटात महाराष्ट्राने मणिपूर संघावर ११७ धावांनी विजय मिळविताना उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.