महाराष्ट्राची मणिपूरवर मात; केला उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

MH vs MP: हरियाणा येथे महाराष्ट्राची उप-उपांत्यपूर्व फेरीत १२ ऑक्टोबरला मध्य प्रदेशविरुद्ध लढत होईल.
maharashtra cricket
maharashtra cricketesakal
Updated on

Maharashtra vs Manipur: नागपूर येथे झालेल्या बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत ‘ड’ गटात ईश्वरी अवसरेने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने मणिपूर संघावर ११७ धावांनी विजय मिळविताना उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

लेडी अमृताबाई डागा महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १७६ धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा कर्णधार ईश्वरी अवसरेने केलेल्या नाबाद शतकाचा होता. ईश्‍वरी आणि भाविका अहिरेने पहिल्या विकेटकरिता ८० धावांची भागीदारी केली. त्यानंतर ईश्वरी आणि महेक मुल्लाने तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. ईश्वरीने ७० चेंडूंत १४ चौकार व तीन षटकारांसह नाबाद १०५ धावा केल्या. यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा सामना करण्यात मणिपूरच्या फलंदाज अपयशी ठरल्या. मणिपूरकडून केवळ दोघींनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. मणिपूरला सात बाद ५९ धावा करता आल्या आचल अगरवालने तीन, तर गायत्री सुरवसेने दोन गडी बाद केले.

maharashtra cricket
ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

‘ड’ गटात महाराष्ट्र संघ १६ गुणांसह दुसऱ्या, तर हरियाना २० गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्राने हरियाणाविरुद्धची पहिली लढत गमावल्यानंतर सलग चार विजय मिळवले. महाराष्ट्राची आता उप-उपांत्यपूर्व फेरीत बारा ऑक्टोबरला मध्य प्रदेशविरुद्ध लढत होईल. हे सामने हरियाणा येथे होत आहेत.

धावफलक :

महाराष्ट्र - (२० षटकांत) ३ बाद १७६ (ईश्वरी अवसरे नाबाद १०५, महेक मुल्ला २७, भाविका अहिरे २६, अंगोबी २-२६, बर्कातून १-२४) विजयी विरुद्ध मणिपूर - (२० षटकांत) ७ बाद ५९ (तानिया निंगथोयूजाम नाबाद १९, मेहनास १८, आचल अगरवाल ३-१२, गायत्री सुरवसे २-१२, भूमिका चव्हाण १-९, श्रुती महाबळेश्वरकर १-४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.