India vs New Zealand test series: भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मालिका भारतामध्ये खेळवण्यात येईल. दोन देशांमधील आगामी मालिकेबाबत न्यूझीलंडचा माजी खेळाडू मार्टीन गप्टील याने स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय फिरकीपटूंचे फिरक घेणारे चेंडू तसेच जे चेंडू वळत नाहीत हे ओळखण्याचे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर असणार आहे.
मार्टीन गप्टील पुढे म्हणाला, भारतामध्ये क्रिकेट खेळणे सर्वात कठीण आहे. खेळपट्टी, वातावरण, हवामान सर्वच आपल्याविरोधात आहे, असे वाटू लागते; पण अव्वल दर्जाचा खेळ केल्यास भारतावर वर्चस्व गाजवता येऊ शकते. फिरकीपटूंचा सामना करताना मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवे.
मार्टीन गप्टील नमूद करतो की, जसप्रीत बुमराह व रवीचंद्रन अश्विन या दोन गोलंदाजांसह रवींद्र जडेजाकडून न्यूझीलंडला सावध राहावे लागणार आहे. बुमरा व अश्विन हे दिग्गज गोलंदाज आहेत. त्यामुळे दोनही गोलंदाजांसमोर सावध खेळ करायला हवा; पण जडेजालाही कमी लेखून चालणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताचा पाय खोलात गेला असताना अश्विन व जडेजा या जोडीने सामन्याचा नूर बदलून टाकला हेही विसरता कामा नये.
पहिला सामना : १६ ऑक्टोबर - २० ऑक्टोबर, एमए चिन्नस्वामी स्टेडियम, चेन्नई
दुसरा सामना : २४ ऑक्टोबर - २८ ऑक्टोबर, एसीए स्टेडियम, पुणे
तिसरा सामना : १ नोव्हेंबर - ५ नोव्हेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.