Cricket Retirement: ऑस्ट्रेलियाच्या T20 वर्ल्ड कप विजेत्या धाकड खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; पाकिस्तानलाही फोडलेला घाम

Matthew Wade announced retirement from International Cricket: ऑस्ट्रेलियाच्या स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे निवृत्ती घेतल्यानंतरही तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असणार आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
Adam Zampa - Matthew Wade
Adam Zampa - Matthew WadeSakal
Updated on

Matthew Wade Retirement: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २०२१ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये मोठे यश पाहिले. त्यांनी त्या स्पर्धेत ऍरॉन फिंचच्या नेतृत्वात पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात मोलाचा वाटा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने उचलला होता.

ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देण्यात त्याचे मोठे योगादान होते. त्याने १७ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केलेल्या. १९ व्या षटकात त्याने सलग ३ षटकार खेचत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान आता मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मॅथ्यू वेडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत ३६ कसोटी, ९७ वनडे आणि ९२ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४ शतकांसह १६१३ धावा केल्या, तर वनडेमध्ये १ शतकासह १८६७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने ३ अर्धशतकांसह १२०२ धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२५ सामन्यांमध्ये यष्टीमागे २५५ विकेट्स घेतल्या आहेत.

Adam Zampa - Matthew Wade
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नर सोडा, १९ वर्षांचा ओपनर टीम इंडियाला घाम फोडणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑसी कोचचे संकेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.