मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

India A team won Duleep Trophy 2024-25: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेचे विजेतेपद मयंक अगरवालच्या नेतृत्वातील भारत अ संघाने जिंकले. अखेरचे ४ षटके बाकी असताना त्यांनी भारत क संघाला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरले.
Duleep Trophy | India A
Duleep Trophy | India ASakal
Updated on

Duleep Trophy India A vs India C: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धा रविवारी संपली असून या स्पर्धेचे विजेतेपद मयंक अगरवालच्या नेतृत्वातील भारत अ संघाने जिंकले. त्यांनी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारत क संघाला रोमांचक सामन्यात १३२ धावांनी पराभूत करत १२ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

भारत क संघाकडून साई सुदर्शनने शतकी खेळी करत चांगली झुंज दिली होती. तसेच बाबा इंद्रजीतही दुखापतीनंतर फलंदाजीला आला होता. परंतु, असं असतानाही भारत क संघाला शेवटची काही षटके खेळून सामना वाचवून विजेतेपदावर नाव कोरता आले नाही. भारत क संघ गुणतालिकेत ९ पाँइंट्ससह दुसऱ्या स्थानावर राहिले.

या सामन्यात भारत अ संघाने भारत क संघासमोर शेवटच्या दिवशी ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत क संघ ८१.५ षटकात २१७ धावांवर संपला.

महत्त्वाचे म्हणजे या सामन्यात भारत क संघाला शेवटचे केवळ ४.१ षटके उरली असताना सामना पराभूत व्हावा लागला. जर हा सामना भारत क संघाने अनिर्णित राखण्यात यश मिळवले असते, तर त्यांनी विजेतेपद जिंकले असते. पण अखेरच्या क्षणी भारत क संघाचे प्रयत्न अपुरे ठरले.

Duleep Trophy | India A
Duleep Trophy: अर्शदीपच्या ६ विकेट्स अन् श्रेयस अय्यरच्या संघाने चाखली विजयाची चव, पण फायदा होणार ऋतुराजच्या संघाला?

भारत अ संघाने रविवारी दुसरा डाव ८ बाद २८६ धावांवर घोषित केला होता. त्यांच्याकडून या डावात रियान परागने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तसेच शाश्वत रावतने ५३ धावा केल्या. भारत क संघाकडून गौरव यादवने ४ विकेट्स घेतल्या होत्या.

भारत अ संघाने पहिल्या डावात ६३ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांनी भारत क संघासमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारत क संघाकडून दुसऱ्या डावात ऋतुराज गायकवाड आणि विजय कुमार वैशाख यांनी सुरुवात चांगली केली होती. पण वैशाख १७ धावांवर बाद झाला.

पण त्यांनंतर ऋतुराज आणि साई सुदर्शन यांची जोडी जमली. त्यांनी ७७ धावांची भागीदारी केली. मात्र त्यांची भागीदारी अकिब खानने ऋतुराजला ४४ धावांवर बाद करत तोडली. यानंतर अकिब खान आणि तनुष कोटियन यांच्या गोलंदाजीपुढे भारत क संघाचे रजन पाटीदार (७), इशान किशन (१७), अभिषेक पोरेल (०) हे स्वस्तात बाद झाले.

पण तरी एक बाजू सुदर्शनने सांभाळली होती. त्याला आधी पुलकीत नारंगने साथ दिली. पण २४ चेंडूत ६ धावा केलेला पुलकित दुदैवीरित्या झेलबाद झाला. तरी त्यानंतरही मानव सुतारने सुदर्शनला साथ दिली होती. त्यांनी बराच वेळ खेळून काढला. पण मानवला ७७ व्या षटकात शम्स मुलानीने बाद केले. मानवने ३५ चेंडूत ७ धावा केल्या होत्या.

मानव बाद झाल्यानंतर एक बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या साई सुदर्शनला प्रसिद्ध कृष्णाने ७८ व्या षटकात बाद केले. सुदर्शनने २०६ चेंडूत १११ धावांची झुंजार शतकी खेळी केली.

Duleep Trophy | India A
Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

यानंतरही दुखापत असतानाही इंद्रजीत मैदानात उतरला. त्याने पाय न हालवता फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण तो २ चेंडूंनंतर स्लीपमध्ये तिलक वर्माकडे झेल देत बाद झाला. शेवटी अंशुल कंभोज आणि गौरव यादव यांनी उर्वरित ५ षटके खेळून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंशुलला प्रसिद्ध कृष्णाने पायचीत करत भारत संघाचा डाव संपवला.

दुसऱ्या डावात भारत अ संघाकडून तनुष कोटियन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच अकिब खानने ३ आणि शम्स मुलानीने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारतीय अ संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ९०.५ षटकात सर्वबाद २९७ धावा केल्या. त्यांच्याकडून शाश्वत रावतने सर्वाधिक १२४ धावांची खेळी केली होती. याशिवाय आवेश खानने ५१ धवांचे आणि शम्स मुलानीने ४४ धावांचे योगदान दिले होते. भारत क संघाकडून वैशाखने सर्वाधिक ४ विकेट्स घेतलेल्या.

यानंतर भारत क संघ पहिल्या डावात ७१ षटकात सर्वबाद २३२ धावाच करू शकला. भारत संघाकडून इशान पोरेलने ८२ धावांची झुंज दिली होती. पुकित नारंगही ४१ धावा करत लढला होता. पण बाकी कोणाला विशेष काही करता आले नव्हते. भारत अ संघाकडून आवेश खान आणि अकिब खान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.