IND vs BAN: मयंक यादवने आपलं नाणं खणखणीत वाजवलं! पदार्पणाच्या T20I सामन्यातच केली १८ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी

Mayank Yadav start start international career with maiden over: भारतासाठी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून वेगवान गोलंदाज मयंक यादवने पदार्पण केले. त्याने पदार्पणातच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Mayank Yadav
Mayank YadavSakal
Updated on

India vs Bangladesh, 1st T20I: भारत विरुद्ध बांगलादेश संघात टी२० मालिकेतील पहिला सामना रविवारी (७ ऑक्टोबर) ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखल्याचे दिसले होते. दरम्यान, या सामन्यातून २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने पदार्पणाच त्याचं नाणं खणखणीत वाजवलंही.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून सहाव्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादवने मयंककडे चेंडू सोपवला. मयंकनेही आपले पहिलेच षटक कोणताही दबाव न दाखवता टाकले आणि विशेष म्हणजे त्याने संपूर्ण षटकात एकही धाव दिली नाही.

Mayank Yadav
Mayank Yadav Video: मयंकच्या वेगानं RCB चे फलंदाज गारद! 156.7kph स्पीडचा बॉल टाकत रचला नवा विक्रम

त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दच निर्धाव षटक टाकून सुरू झाले. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातील पहिले षटक निर्धाव टाकणारा भारताचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम केवळ अजित आगरकर आणि अर्शदीप सिंग यांनाच जमला आहे.

आगरकरने २००६ साली जोहान्सबर्गला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले षटक निर्धाव टाकले होते. तसेच अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये साउथम्पटनला इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२० सामन्यातून पदार्पण करताना पहिलेच षटक निर्धाव टाकले होते.

मयंकने या सामन्यात एक विकेटही घेतली. त्याने डावाच्या ८ व्या षटकात बांगलादेशचा अनुभवी खेळाडू महमुद्दुलाहला वॉशिंग्टन सुंदरच्या हातून १ धावेवर झेलबाद केले. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेटही ठरली.

Mayank Yadav
IPL 2024 : लखनौला मोठा धक्का! 'स्पीड गन' Mayank Yadav जखमी, एका ओव्हरनंतर अचानक...

मयंकने या सामन्यात ४ षटकात २१ धावा खर्च करताना एक विकेट घेतली. त्याच्यातील गोलंदाजी कौशल्याने भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनलाही प्रभावित केले. त्यानेही त्याच्यासाठी कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मयंक आयपीएल २०२४ मधून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने आयपीएल २०२४ मध्ये सातत्याने ताशी १५० किमीच्या आसपास गोलंदाजी करत प्रभावित केले होते.

दरम्यान, बांगलादेशने पहिल्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने ११.५ षटकात ३ विकेट्स गमावत १३२ धावा करत पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.