MI Cape Town retention list: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला वेग पकडला आहे. आयपीएल फ्रँचायझींच्या सूचना ऐकून BCCI आगामी हंगामासाठी प्रत्येक संघाला ६ खेळाडू रिटेन करण्याची मूभा देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता कोणती फ्रँचायझी कोणत्या सहा खेळाडूंना कायम ठेवतात याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ही उत्सुकता असताना मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे.
Mumbai Indians फ्रँचायझीच्या केप टाऊन संघाने आज आगामी दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगसाठी रिटेन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी ऑक्शनपूर्वीच्या प्री साईन परदेशी खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. MI Cape Town ने अष्टपैलू खेळाडू राशीद खान याला करारबद्ध केले आहे आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टही फ्रँचायझीकडून खेळणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्लाह ओमारझाई, श्रीलंकेचा नुवान तुषारा आणि ख्रिस बेंजामिन यांनाही फ्रँचायझीने संघात कायम राखले आहे. प्री साईन स्थानिक खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, रायन रिकल्टन, जॉर्ज लिंडे, डेलानो पॉटगिएटर, थॉमस कबेर आणि कोनोर यांची समावेश आहे.
मुंबई इंडियन्स, एमआय एमिरेट्स, एमआय न्यू यॉर्क आणि एमआय केप टाऊन... अशा चार फ्रँचायझीकडून टेंट बोल्ट खेळणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये ही लीग खेळवण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.
एमआय केप टाऊन संघ दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळतो आणि तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा संघ आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक फ्रँचायझी आहे. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगसह ILT20 मध्ये एमआय एमिरेट्स व MLC मध्ये एमआय न्यू यॉर्क या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझी खेळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.