Steve Smith पुन्हा झाला वनडे कर्णधार, पण मिचेल मार्शने का घेतली माघार? जाणून घ्या कारण

ENG vs AUS 5th ODI: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे मालिका २-२ गुणांसह बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा सामना मालिका विजेता ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
steven smith
steven smithesakal
Updated on

ENG vs AUS 5th ODI: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे मालिका २-२ गुणांसह बरोबरीत आहे. पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर इंग्लंडने मालिकेत पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने आपल्या नावे केले.

या मालिकेतील अंतिम सामना आज इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे सुरू आहे. आज अंतिम सामन्याच्या नाणेफेकीवेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श ऐवजी माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ नाणेफेकीसाठी आला. स्मिथला कर्णधारपदी पाहून प्रेक्षक अचंबित झाले.

परंतु मिचेल मार्शचे कर्णधारपद अचानक स्मिथकडे सोपवण्याचे कारण समोर आहे. कर्णधार मिचेल मार्श पूर्णत: तंदुरूस्त नसल्याने हा सामना खेळू शकत नाही. त्यामुळे शेवटच्या महत्वाच्या सामन्याची जबाबदारी अनुभवी कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे सोपण्यात आली आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अनेक सामने जिंकले आहेत. त्यामुळे या महत्वाचे सामन्याचे कर्णधारपद स्मिथकडे देण्यात आले.

steven smith
'...तर खेळाडू बंदीला सामोरे जाणार', IPL च्या नव्या नियमाचे Irfan Pathan कडून स्वागत

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. इंग्लंडकडून सलामीसाठी आलेल्या फिल सॉल्ट आणि बेन डकेटने न सुंदर फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली .

पण ऑस्ट्रेलियन गोलंदाज ऍरॉन हार्डीने सॉल्टला ४५ धावांवर माघारी पाठवले. तर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विल जॅक्सला देखील हार्डीने मैदानात टिकू दिले नाही. जॅक्सला एकही धाव न करता परतावे लागले. परंतु त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूकने डकेटला साथ देत चांगली फलंदाजी केली. या दोघांच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.

नंतर ॲडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर ब्रूकला ७२ धावांची अर्धशतकी खेळी करत परतावे लागले. त्यानंतर इंग्लंड संघाला उतरती कला लागली. परंतु, डकेटने एका बाजूने खेळ लावून धरत शतक पूर्ण केले. डकेटने या खेळीमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह १०७ धावा केल्या.

steven smith
WTC 2023-25 Points Table: श्रीलंकेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडला व्हाईटवॉशचा धक्का अन् वाढलं भारत-ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

त्यानंतर इंग्लंडचा डाव ३०९ धावांवर संपुष्टात आला. महत्वाचे म्हणजे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडने ४ विकेट्स घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकण्यासाठी ३१० धावांचे लक्ष्य पार करावे लागेल. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.