Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने घटस्फोट घेताना शमीवर अनेक आरोप केले होते. ज्यामध्ये तिने शमीवर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. त्यामुळे शमीच्या घटस्फोटाचा मुद्दा चर्चेच्या अग्रस्थानी आला होता. पत्नीने केलेल्या नव्या आरोपामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.
शमी दुखापतीमुळे जवळपास वर्षभरापासून संघाबाहेर आहे. तो अलीकडेच त्याची मुलगी आयराला खूप दिवसांनी भेटला. शमीने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतच्या भेटीचा भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने लिहीले, “बऱ्याच दिवसांनी तिला पुन्हा पाहिल्यावर घड्याळाचे काटे थांबल्यासारखे वाटले. खूप प्रेम बेबी.
शमीची घटस्फोटीत पत्नी हसीन जहाँने या भेटीबाबत शमीवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. त्यावर स्वाक्षरी करण्याऐवजी तो तिला मॉलमध्ये फिरायला घेऊन गेला.
हसीन जहाँ म्हणाली “हा दिखावा आहे. माझ्या मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळेच ती वडिलांना भेटायला गेली, पण शमीने सही केली नाही. तो मुलीसोबत शॉपिंग मॉलमध्ये गेला होता. शमी ज्या कंपनीसाठी जाहिरात करतो, तो तिला तिथे घेऊन गेला. माझ्या मुलीने त्या दुकानातून बूट आणि कपडे घेतले. कारण तिथून काही खरेदी केल्यास शमीला पैसे द्यावे लागत नाहीत. माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता, परंतु त्याने त्या वस्तू विकत घेतल्या नाहीत.”
"शमी कधीही मुलीची विचारपूस करत नाही. तो फक्त स्वतःमध्ये व्यग्र असतो. तो तिला एक महिन्यापूर्वी भेटला होता, पण त्यावेळी त्याने कोणतेही पोस्ट केली नाही. आता पोस्ट करण्यासारखे काही नव्हते, म्हणून त्याने हा व्हिडिओ अपलोड केला," हसीन जहाँ पुढे म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.