Mohammed Shami: भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या मार्गावर असलेल्या मोहम्मद शमीला त्याच्या पुनरागमनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गुडघ्याला सरावादरम्यान पुन्हा दुखापत झाल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील त्याचा सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शमीने २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपनंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही . पायाच्या दुखापतीमुळे वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून तो मैदानाबाहेर आहे. अशातच ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत शमी पुनारागमन करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
परंतु कोलकाता येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, शमीने त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल मत व्यक्त केले होते. शमीने सांगितले की तो १०० टक्के तंदुरुस्त झाल्यावरच राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल म्हणजे पुन्हा दुखापत होण्याचा धोका असणार नाही.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी शमीच्या पुनरागमनावर आश्वासन दिले होते की शमी बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाचा भाग असेल. शाह म्हणाले होते की, "शमी बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघामध्ये असेल, कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि आम्हाला त्याची ऑस्ट्रेलियामध्ये गरज आहे."
परंतु शमीच्या नव्या दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन आणखी दोन महिने लांबवू शकते. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार "शमीने पुन्हा गोलंदाजी सुरू केली होती आणि तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या मार्गावर होता. पण अलीकडेच ही गुडघ्याची दुखापत झाली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दुखापतीवर काम करत आहे, परंतु त्यासाठी थोडा वेळ लागेल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.