त्याच्या हिशोबात नाही राहिलात तर...! मोहम्मद शमीनं उघडं केलं Rohit Sharma चं मोठं सिक्रेट

Mohammed Shami Reveals Rohit Sharma's Secret: कर्णधार रोहित शर्मा ज्या पद्धतीने भारतीय संघाचे नेतृत्व करतो, त्याचे सर्वांना कौतुक आहे. तो वेळ पडेल तेव्हा रागावतोही, शिव्याही देतो. पण, खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभाही राहतो.
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal
Updated on

Captain Rohit Sharma : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकला. तब्बत १७ वर्षांनी भारतीय खेळाडूंच्या हाती ट्वेंटी-२० वर्ल्ड कप दिसला आणि चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. मुंबईच्या रस्त्यांवार निघालेली परेड जगाचं लक्ष वेधून गेली... कर्णधार रोहित हा खरा माणूस आहे, जे मनात ते ओठांवर अशी त्याची ख्याती आहे. पण, भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) याने हिटमॅनचे 'सिक्रेट' काल सांगितले.

रोहित खेळाडूंना मैदानावर पूर्ण स्वातंत्र्य देतो आणि तसं वातावरण त्याने संघात निर्माण केले आहे. त्याची मतं स्पष्ट आहेत आणि तो बऱ्याचदा शांत दिसला आहे. पण, मध्येच त्याचा पारा चढलेलाही पाहायला मिळाला आहे आणि त्याच्या तोंडूंन शिव्याही निघालेल्या दिसल्या आहेत. पण, त्याच्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे आणि एखाद्या मित्रासोबत ज्याप्रमाणे आपण बिनधास्त वागतो, तसं तो संघातील प्रत्येक खेळाडूसोबत राहतो.

Rohit Sharma
जय शाह यांच्यासह ३ जणं T20 World Cup यशामागचे खरे Pillars; Rohit Sharma नं दिलं क्रेडिट

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने काल रोहितचे सिक्रेट सांगितले. रोहित आपल्या खेळाडूंना भरपूर स्वातंत्र्य देतो, त्यांना आत्मविश्वासाने आणि अनावश्यक दबावाशिवाय कामगिरी करू देतो, असे शमीने सांगितले. तो पुढे म्हणाला,''रोहितच्या बाबतीत सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, तो खेळाडूंना स्वातंत्र्य देतो. जर तुम्ही त्याच्या हिशोबाने नाही खेळलात, तर त्याचे रिॲक्शन बाहेर येतात. काय करायचे आहे, काय हवं आहे, हे तो तुम्हाला सांगतो.''

''तरीपण तुम्ही त्याच्या विश्वासावर खरे नाही उतरलात, तर तुम्हाला स्क्रीनवर त्याच्या रिॲक्शन कशा असतात हे दिसताताच. ते न ऐकताच तो काय म्हणाला हे तुम्हाला कळते,'' शमी असे म्हणताच एकच हशा पिकला.

यावेळी शमीने एक खंतही बोलून दाखवली... त्याला २०१५, २०१९ व २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, काही सामन्यानंतर संधी मिळाल्यावर त्याने कमाल करून दाखवली. तो म्हणाला, मागील दोन वर्ल्ड कपप्रमाणे २०२३ मध्येही मला तोच अनुभव आला. पण, संधी मिळाल्यानंतर मी जी कामगिरी केली, त्यानंतर मला पुन्हा बेंचवर बसवण्याचा कुणी विचारच केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.