Mohammad Shami ने मागितली BCCI ची माफी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर पोस्ट केला Video

Mohammad Shami apologised to fans and BCCI: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात मोहम्मद शमीला निवडण्यात आलेलं नाही. त्यानंतर आता शमीने एक पोस्ट शेअर करत बीसीसीआयची माफी मागितली आहे.
Mohammad Shami
Mohammad ShamiSakal
Updated on

Mohammad Shami News: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठीही महत्त्वाची आहे.

मात्र, या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संघात संधी मिळालेली नाही. यामागील कारण म्हणजे त्याची तंदुरुस्ती आहे.

शमी गेल्या एक वर्षापासून पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. मात्र, त्याला पुरेशी तंदुरुस्ती राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवडण्यात आलेलं नाही. त्याच्याआधी या दौऱ्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांना संघात संधी देण्यात आली आहे.

Mohammad Shami
Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.