Mohammad Shami News: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २०२३ वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळतानाच दिसलेला नाही. या वर्ल्ड कपमध्ये त्याने सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याच्या टाचेच्या दुखापतीने डोकं वर काढलं. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर गेला.
या दुखापतीमुळे त्याला या वर्षाच्या सुरुवातीला शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली, ज्यामुळे त्याला आयपीएल २०२४ आणि टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धाही खेळता आली नाही. पण आता तो दुखापतीतून सावरला असून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, असं असतानाच आता तो क्रिकेट न खेळून जवळपास वर्ष होत आल्याने तो पुनरागमन कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.