Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत व्यस्त आहे. अशात भारताचा 33 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे.
मोहम्मद शमी 2023 वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याला टाचेच्या दुखापतीमुळे गेले 6 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. तो भारतासाठी 2023 वर्ल्ड कपमध्ये स्टार परफॉर्मर राहिला होता. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र या स्पर्धेनंतर त्याला टाचेच्या दुखापतीने घेरले, अखेर त्याला फेब्रुवारी 2024 मध्ये शस्त्रक्रिया करावी लागली होती.
त्यामुळे त्याला आयपीएल 2024 स्पर्धा आणि टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेलाही मुकावे लागले आहे. पण या शस्त्रक्रियेनंतर आता तो दुखापतीतून सावरत असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे.
त्याच्या ट्रेनिंगचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता लवकरच तो भारतीय संघासही पुनरागमन करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
शमी यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मायदेशात होणाऱ्या बांगलादेश आणि न्युझीलंड विरुद्धच्या मालिकांमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
याबाबत काहीदिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली होती. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जायचे आहे, त्याआधी शमी पूर्ण तंदुरुस्त होऊन या दौऱ्यात खेळण्यासाठी पूर्ण सज्ज असेल, अशी अपेक्षा भारतीय संघालाही असेल.
शमीने त्याच्या कारकिर्दीत 64 कसोटी सामने खेळताना 229 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 101 वनडे सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 24 विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.