महिला जीवंत असते तोपर्यंत तिला...! मोहम्मद शमीच्या Ex पत्नीची कोलकाता प्रकरणावर पोस्ट Viral

Kolkata doctor's rape-murder: कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी या हत्येचा आणि बलात्काराचा निषेध करत आंदोलने केली आहेत.
hasin jahan
hasin jahanesakal
Updated on

Kolkata doctor's rape-murder: कोलकाता येथील R.G. Kar Medical कॉलेज आणि हॉस्टिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. या घटनेच्या निषेधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक सेलिब्रेटिंनी आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अनेकांनी महिलांवर होणारे अत्याचार कधी थांबतील असा थेट सवालच केला आहे. या प्रकरणावर भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याची घटस्फोटीत पत्नी हसनी जहाँ हिने प्रतिक्रिया दिली आहे.

केव्हा घडली घटना?

९ ऑगस्ट रोजी, एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पोस्ट-ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळला. मृतिका आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थी होती.

देशभर निषेध अन् संताप...

कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी या हत्येचा आणि बलात्काराचा निषेध करत आंदोलने केली आहेत.

हसीन जहाँची पोस्ट काय?

हसीन जहाँने पोस्ट लिहिली की, आपला समाज किती विचित्र आहे. महिला जीवंत असते तोपर्यंत तिला त्रास देण्याची कोणतीच कसर सोडली जात नाही आणि जेव्ही तिचे निधन होते, तेव्हा मेणबत्त्या पेटवल्या जातात.

हसनी जहाँ व मोहम्मद शमी का विभक्त झाले?

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न ६ जून २०१४ साली कोलकाता येथे झाले. २०१८ सालापासून ते दोघेही वेगळे राहतात. हसीनने भारतीय गोलंदाजावर मारहाणीचे, फिक्सिंगचे आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.