T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाजांनी भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Japan vs Mongolia T20: टी20 क्रिकेटमध्ये बुधवारी जपान आणि मंगोलिया संघात सामना झाला, ज्यात जपानने मंगोलियाला अवघ्या 12 धावांवर ऑलआऊट करण्याचा पराक्रम केला.
T20 Cricket
T20 CricketSakal
Updated on

Japan vs Mongolia, T20 Cricket: क्रिकेटला अनिश्चितचेचा खेळ असं म्हटलं जातं, कारण क्रिकेटच्या सामन्यात कधी सामना पलटेल, हे सांगता येत नाही. असाच एक सामना नुकताच जपान आणि मंगोलिया संघात पार पडला. बुधवारी (8 मे) झालेल्या या सामन्यात जपानने तब्बल 205 धावांनी विजय मिळवला.

त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील धावांच्या तुलनेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. इतकेच नाही, तर या सामन्यात मंगोलियाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्याही नोंदवण्यात आली.

T20 Cricket
T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

झाले असे की या सामन्यात जपानने मंगोलियासमोर विजयासाठी 218 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलिया संघ 8.2 षटकात अवघ्या 12 धावांवर सर्वबाद झाला.

त्यामुळे त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली गेली.या यादीत अव्वल क्रमांकावर आईल ऑफ मान संघ आहे. त्यांचा संघ स्पेनविरुद्ध 2023 मध्ये 10 धावांवर सर्वबाद झाला होता.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यात मंगोलियाकडून तुर सुम्याने सर्वाधिक 4 धावा केल्या. तसेच 6 फलंदाज शुन्यावर बाद झाले, तर दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या.

T20 Cricket
DC vs RR: सॅमसनच्या विकेटमुळे सामन्यातील राड्यानंतर दिल्लीचे संघमालक अन् राजस्थानच्या कर्णधारामध्ये काय झालं? Video आला समोर

जपानकडून काधुमा काटो-स्टॅफोर्डने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर अब्दुल सामद आणि माकोटो तानियामा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच बेंजामिन इटो-डेविसने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, जपानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 217 धावा केल्या. जपानकडून सबोरिश रविचंद्रनने सर्वाधिक 69 धावा केल्या, तर कर्णधार केंडल कडोवाकी-फ्लेमिंगने 32 धावा केल्या, तर इब्राहिम ताकाहाशीने 31 धावा केल्या.

मंगोलियाकडून झोलजावखलान शुरेंटसेटसेगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर लुव्हसानझुंडुई एर्डेनेबुलगनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच न्यांबतार नरांबतार आणि ऑड लुटबयार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.