MS Dhoni : धोनीचा बंगळुरूतून 'इकॉनॉमी'ने प्रवास; रांचीत केलं मतदान

MS Dhoni Casting Vote : महेंद्रसिंह धोनीने आज आपले नागरी कर्तव्य बजावले. त्याने लोकसभा 2024 साठी मतदान केलं. यावेळी त्याच्या भोवती कॅमेऱ्यांचा गराडा पडला.
MS Dhoni
MS Dhoni Cast Voteesakal
Updated on

MS Dhoni Cast Vote : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा थला महेंद्रसिंह धोनीने आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानं आपलं होम टाऊन रांची येथे जाऊन मतदान केलं. आयपीएलमधील चेन्नईचे आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात आल्यानंतर धोनी रांचीत पोहचला होता.

गतविजेत्या चेन्नईला रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 28 धावांनी मात दिली होती. त्यानंतर धोनीने बंगळुरूवरून रांचीची फ्लाईट बुक केली होती. त्याने हा प्रवास इकॉनॉमी क्लासने केला होता.

MS Dhoni
Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होण्यात SRK निभावणार महत्वाची भुमिका?

रांचीमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संजय सेठ आणि काँग्रेसच्या यशस्विनी सहाय यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भारताचा माजी कर्णधार धोनी ज्यावेळी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला त्यावेळी लगेच कॅमेरा अन् पत्रकारांनी त्याला गराडा घातला.

दरम्यान, निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर धोनी मतदान करण्यासाठी आल्याचा व्हिडिओ शेअर केला. आज (दि. 25 मे) देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यात 58 लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. देशातील सहा राज्यात आणि दोन केंद्र शासित प्रदेशात आज मतदान होत आहे.

MS Dhoni
Daniel Vettori : शांत, संयमी पडद्यामागचा कलाकार; व्हिटोरीचा एक निर्णय अन् हैदराबादचं नशीब पालटलं

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. ही मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.