MS Dhoni ने माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली, मी त्याला कधीच माफ करणार नाही! कोणी केले गंभीर आरोप?

Yograj Singh criticised MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
MS Dhoni Yograj singh
MS Dhoni Yograj singh esakal
Updated on

MS Dhoni, Yuvraj Singh Father Yograj Singh:

भारतीय संघाच्या महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार... महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आणि त्यामुळे आजही त्याच्या नावाची हवा आहे. पण, भारताचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंग याचे वडील योगराज यांनी पुन्हा एकदा MS Dhoni वर जहरी टीका केली आहे.

२०११च्या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार धोनीवर योगराज यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. धोनीने त्यांचा मुलगा युवराज याच्या आयुष्याची वाट लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पण, युवराज नेहमीच धोनीबाबत सकारात्मक बोलत आला आहे. २००७ ते २०१५ या कालावधीत युवराज सिंगने २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व २०११ चा वन डे वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. भारताने या दोन्ही स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली युवीने कारकीर्दित यशोशिखर गाठले होते.

MS Dhoni Yograj singh
Gautam Gambhir ने त्याच्या संघातून T20WC विजेत्या रोहित शर्माला बाहेर केले; जसप्रीत बुमराहला पण नाही घेतले

पण, योगराज सिंग यांनी यूट्यूब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धोनीवर युवीची कारकीर्द संपवण्याचा आरोप केला आणि त्यासाठी कॅप्टन कूलला कधीच माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

''मी धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात पाहायला हवा. तो खूप मोठा क्रिकेटपटू आहे, परंतु त्याने माझ्या मुलासोबत जे केलं, ते आता समोर येत आहे. त्याला माफी नाही. ज्या व्यक्तीने माझ्यासोबत चूक केलं त्याला मी कधीच माफ करत नाही आणि त्या व्यक्तीला कधीच कुटुंबाचा भाग करणार नाही,''असे योगराज म्हणाले. Zee Switch YouTube चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली.

MS Dhoni Yograj singh
तुझी कामगिरीच बोलकी असायला हवी! Samit Dravid ला राहुलने दिला होता सल्ला

युवराज सिंगला भारतरत्न द्या...

महेंद्रसिंग धोनीमुळेच युवराजने लवकर निवृत्ती घेतली, असा आरोप करत योगराज म्हणाले की, या माणसाने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तो आणखी ४-५ वर्ष सहज खेळला असता. युवराज सिंगसारखा खेळाडू होणे नाही, असे गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. कॅन्सर असताना तो खेळला आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याला भारतरत्न द्यायला हवं.''

Yuvraj Singh's biopic
Yuvraj Singh's biopic esakal

युवराज सिंगची आकडेवारी

युवराज सिंगने २००७ ते २०१७ या कालावधीत ४०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १११७८ धावा केल्या. यात १७ शतकं व ७१ अर्धशतकांचा समावेश आहे. २००२ ची चॅम्पियन्स ट्रॉफी ( श्रीलंकेसोबत संयुक्त), २००७ वर्ल्ड कप आणि २०११च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. युवीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.