MS Dhoni on Relation with Virat Kohli: भारताचे माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली हे एकमेकांचे मैदानाबाहेरही खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकमेकांचे कौतुकही करतात. बऱ्याचदा आयपीएल दरम्यान जेव्हा हे दोघं एकमेकांना भेटतात आणि गप्पा मारतात, तेव्हा त्यांचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
चाहत्यांनी त्यांच्या जोडीला माहिराट असं नावही दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या मैत्रीबद्दल ते काय विचार करतात याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये असते. आता खुद्द धोनीनेच त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितले आहे. धोनीने सांगितले की जेव्हाही ते भेटतात, तेव्हा ते एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढतात.
धोनी आणि विराट बरेच वर्षे एकत्र भारतासाठी खेळले आहेत. विराटने वनडे, टी२० आणि कसोटी पदार्पणही धोनीच्याच नेतृत्वात केले आहे. तसेच धोनीने नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर विराटकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यामुळे धोनीही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काही वर्षात विराटच्या नेतृत्वात खेळला.
दरम्यान, नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना धोनीने विराटसोबतच्या मैत्रीबद्दल सांगितले की, 'आम्ही भारतासाठी अनेकवर्षे एक खेळताना सहकारी होतो. जिथे जागतिक क्रिकेटची गोष्ट आहे, तिथे विराट सर्वोत्तम आहे.'
धोनी पुढे म्हणाला, 'खरं म्हणजे मी मधल्या षटकांमध्ये त्याच्याबरोबर खूप फलंदाजी केली आहे. त्याच्याबरोबर फलंदाजी करताना मजा यायची, कारण आम्ही खूप दुहेरी आणि तिहेरी धावा धावायचो.'
'आम्ही सातत्याने भेटतो असं नाहीये, पण जेव्हाही आम्हाला भेटण्याची संधी मिळते, तेव्हा आम्ही बाजूला जाऊन आवर्जून गप्पा मारतो. आम्ही सध्या काय चालू आहे वैगरे बोलतो. आमचं हे असं नातं आहे.'
दरम्यान, धोनी आणि विराट यांनी एकत्र खेळताना 2011 वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या दोन्ही स्पर्धेत धोनी कर्णधारही होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी आणि विराट यांनी ८० सामन्यांमध्ये भागीदारी करताना ३०९० धावा केल्या आहेत. त्यांनी ६ वेळा शतकी आणि १९ वेळा अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.