MS Dhoni not playing IPL 2025? इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही? हा प्रश्न प्रत्येक चाहत्याला सतावतोय.. मागील ३-४ वर्ष ही चर्चा सुरू होती आणि कॅप्टन कूल धोनीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. पण, आयपीएल २०२४ मध्ये धोनीला अडखळताना पाहिले गेले, गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रीयेनंतर धोनीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट जाणवत होते. मॅचनंतर लंगडताना दिसला. त्यामुळे ४१ वर्षी धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळेल का, ही शंका अजूनही मनात घर करून आहे. त्याने खेळावं ही जरी चाहत्यांची इच्छा असली तरी योग्यवेळी थांबलेलं बरं याची खेळाडूला जाण असतेच... धोनीने तसे संकेत तरी दिलेले नाहीत, पण आगामी ऑक्शनमध्ये काय घडतं, यावर अवलंबून आहे.
फ्रँचायझींनी ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती BCCI कडे केली होती. त्यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यात धोनीला संघात कायम ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने जुना नियम आणण्याची विनंती केल्याचे वृत्त होते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ५ वर्षांहून अधिक काळ निवृत्त झालेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कमी किमतीत घेता येत होतं. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार CSK चा धोनीसाठी हा प्रयत्न होता. पण, नंतर चेन्नईच्या फ्रँचायझीने त्याचे खंडन केले.
आता चेन्नई सुपर किंग्सकडून मोठे अपडेट्स समोर येत आहेत. २००८ पासून फ्रँचायझीसोबत असलेल्या धोनीच्या पुढील पर्वात खेळण्यावरच CSK ने फैसला घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीचं आयपीएल २०२५ मध्ये खेळणे, हे कोणत्याही पॉलिसीवर अवलंबून नसल्याचे CSK ने स्पष्ट केले. किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली जाते किंवा मेगा ऑक्शनमध्ये काय होतं, यावर धोनीचं खेळणं अवलंबून नाही. थाला यापुढेही चेन्नई सुपर किंग्सचंच प्रतिनिधित्व करेल, असे CSK च्या सूत्रांनी क्रिकबजला सांगितले.
धोनी आयपीएलच्या १८व्या पर्वात खेळणार आहे. फ्रँचायझींना जरी दोन खेळाडूच रिटेन करण्याची मुभा दिली तरी धोनी त्यात असेल, परंतु धोनीच्या निर्णयावर सर्वकाही अवलंबून आहे. जर त्याने खेळणार असल्याचे सांगितले, तर त्याला नक्की रिटेन केले जाईल, असेही या वृत्तात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.