IPL 2025 : नाट्यमय वळण! MS Dhoni साठी तशी विनंती केलीच नाही; CSK च्या दाव्याने संभ्रम

IPL 2025 MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पुढील पर्वात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण करणारे वृत्त समोर येत आहे.
ms dhoni
ms dhoniesakal
Updated on

CSK CEO clarification retaining MS Dhoni: इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी पर्वासाठी BCCI आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी जुना नियम घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष झालेल्या खेळाडूंना या नियमाचा फायदा होणार आहे. BCCI आणि फ्रँचायझी मालकांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा विषय निघाला आणि IPL 2025 Mega Auction मध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो.

२०२१ पर्यंत हा नियम अस्तित्वात होता, परंतु दोन नव्या संघांच्या सहभागानंतर तो रद्द केला गेला. चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) महेंद्रसिंग धोनीसाठी हा नियम पुन्हा आणावा असा आग्रह BCCI कडे धरल्याचे वृत्त समोर आले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पुढील पर्वात अनकॅप्ड खेळाडू म्हणून त्यांना रिटेन करायचे आहे.

महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे जर बीसीसीआयने नियम आणल्यास धोनी त्यास पात्र ठरतो. धोनीची प्रसिद्धी पाहता आणि चेन्नई सुपर किंग्सच्या यशात त्याची भूमिका पाहता त्याने खेळावे असा अनेकांचा आग्रह आहे. हा नियम त्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण, आता नवीन बातमी समोर येत आहे.

ms dhoni
Faf du Plessis उचलबांगडी? RCB च्या ताफ्यात IPL 2025 पूर्वी मेजर बदल; ६ रिटेन खेळाडू जवळपास पक्के

CSK CEO ने वृत्त फेटाळले...

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी आम्ही अशी कोणतीच विनंती बीसीसीआयकडे केली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले,''मला याबाबत कल्पना नाही. आम्ही अशी कोणतीच विनंती केलेली नाही. अनकॅप्ड खेळाडूंचा नियम पुन्हा आणत असल्याचे BCCIनेच आम्हाला सांगितले. त्यांनी आतापर्यंत त्याची घोषणा केलेली नाही. नियमांची घोषणा बीसीसीआय करेल,''असे त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

धोनीचं भविष्यावर संभ्रम

आता या चर्चा समोर येत असताना महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल खेळण्याच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागच्या वर्षी धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली होती. ही फ्रँचायझीच्या नव्या युगाची सुरूवात असल्याचे म्हटले गेले. धोनीला गुडघेदुखी सतावतेय आणि आयपीएल २०२३ मध्ये ते सर्वांनी पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.