MCAने २७ वर्षांनंतर Irani cup जिंकलेल्या मुंबई संघाला जाहीर केले १ कोटी रुपयांचे बक्षीस

Irani cup: शेष भारताविरूद्धचा सामना जिंकून मुंबईने तब्बल २७ वर्षांनंनतर इराणी चषकावर आपले नाव कोरले.
irani cup
irani cupesakal
Updated on

Irani cup 2024: इराणी चषक २०२४ जिंकून मुंबईने इतिहास रचला आहे. शेष भारताविरूद्धचा सामना जिंकून मुंबईने तब्बल २७ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले. सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला. या विजेत्या संघाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मुंबईने तुफान फटकेबाजी करत पहिल्या डावात तब्बल ५३७ धावा उभारल्या. या डावात सर्फराज खानने द्विशतक झळकावले होते. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने ९७ धावा केल्या. श्रेयश अय्यरने (५७) व तनुष कोटियनने (६४) धावांसह डावात अर्धशतक झळकावले.

irani cup
Irani Cup Winner : मुंबई संघाने २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक; Tanush Kotian च्या शतकाने शेष भारताच्या स्वप्नांचा केला चुराडा

प्रत्युत्तरात शेष भारताने कडवी झुंझ देत ४१६ धावसंखेचा टप्पा गाठला. या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने धमाकेदार कामगिरी केली. खेळीदरम्यान त्याने १६ चौकार व १ षटकारासह २९२ चेंडूत १९१ धावा केल्या आहेत. तर ध्रुव जुरेलने डालात ९३ धावा केल्या. अभिमन्यू आणि ध्रुव जुरेलच्या जोडीने १६५ धावांची मोठी भागीदारी केली आहे आणि शेष भारताने मुंबईला प्रत्युत्तर देत ४१६ धावांचा टप्पा गाठला आहे.

मुंबईचा दुसरा डाव घसरत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु शेष भारताचा फिरकीपटू सारांश जैन मुंबईवर भारी पडला आणि त्याने मुंबईचा अर्धा संघ माघारी पाठवला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या तनुष कोटियनच्या शतकाने व मोहित अवस्थीच्या अर्धशतकाने मुंबईला विजयी घोषित केले.

Related Stories

No stories found.