Irani Cup Winner : मुंबई संघाने २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक; Tanush Kotian च्या शतकाने शेष भारताच्या स्वप्नांचा केला चुराडा

Mumbai vs Rest of India: इराणी कप सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे. सामना ड्रॉ झाला आणि मुंबईने शेष भारताविरूद्ध विजय मिळवला आहे.
irani cup
irani cupesakal
Updated on

Mumbai vs Rest of India: मुंबईने आज इतिहास रचला आहे. मुंबईने तब्बल २७ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले आहे. शेष भारताविरूद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात तब्बल ५३७ धावा उभारल्या. या डावात सर्फराज खानने द्विशतक झळकावले होते. तर प्रत्युत्तरात शेष भारताने कडवी झुंझ देत ४१६ धावसंखेचा टप्पा गाठला. या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने धमाकेदार कामगिरी केली.

मुंबईचा दुसरा डाव घसरत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु शेष भारताचा फिरकीपटू सारांश जैन मुंबईवर भारी पडला आणि त्याने मुंबईचा अर्धा संघ माघारी पाठवला. परंतु पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या तनुष कोटियनच्या शतकाने व मोहित अवस्थीच्या अर्धशतकाने मुंबईला विजयी घोषित केले.

मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ एका बाजूने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूने मुंबईचा डाव घसरत होता. त्याचा साथीदार आयूष म्हात्रेदेखील १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेही अवघ्या ९ धावा करून परतला. तरीही पृथ्वी शॉ एकहाती खिंड लढवत होता. परंतु शेवटी ३४ व्या शतकात पृथ्वी शॉ देखील ७६ धावा करत सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पृथ्वी शॉने ८ चौकार व एका षटकारासह १०५ चेंडूत ७६ धावा केल्या.

पहिल्या डावातील द्विशतकवीर सर्फराज खानही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. सर्फराजने या खेळीत अवघ्या १७ धावा जोडल्या आणि सारांश जैनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन परतला. परंतु आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तनुष कोटियनने मुंबईची घसरलेली खेळी पुन्हा उभारण्यास सुरूवात केली आणि शतकापर्यंत मजल मारली. त्याला मोहित अवस्थीची साथ मिळाली व या दोन फलंदाजांनी मुंबईच्या विजयाचा रस्ता सुखकर केला.

२०० धावांच्या आत मुंबईचा डाव आटपेल असे वाटत असताना तनुष आणि मोहितने १५८ धावांची भागिदारी केली आणि मुंबईचा डाव ३०० पार घेऊन गेले. तनुषने १० चौकार व एका षटकारासह ११४ धावांची खेळी केली. तर मोहितने शांतपणे खेळी करत ९३ चेंडूत ५१ धावा जोडल्या. मुंबईचा डाव ढासळला असताना या दोघांनी मुंबईला नवसंजीवनी दिली आणि संघाला विजयापर्यंत घेऊन गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.