Mumbai Indians Captaincy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) लवकरच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठीच्या नियमांची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आणि मालक संजीव गोएंका यांनी या संदर्भात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. झहीर खान याची मेंटॉर म्हणून LSG ने घोषणाही केली. प्रत्येक फ्रँचायझी रिटेन होणाऱ्या खेळाडूंची नावे फायनल करत आहेत आणि Mumbai Indians च्या ताफ्यातही लगबग दिसत आहे. हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) कर्णधार करण्यावरून MI फ्रँचायझीला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे IPL 2025 मध्ये त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याची चर्चा होती.
हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतल्याचा MI चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, परंतु त्याला थेट कर्णधार केल्याने नाराजी पसरली. मुंबईला पाच आयपीएल जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्मावर अन्याय झाल्याची भावना चाहत्यांमध्ये पक्की झाली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक लढतीत हार्दिकवर टीका केली गेली. मुंबई इंडियन्सला IPL 2024 मध्ये चांगली कामगिरीही करता न आल्याने आतातरी हार्दिकला कर्णधारपदावरून हटवा अशी मागणी जोर धरतेय..
हार्दिकने मागील पर्वात १४ सामन्यांत १८च्या सरासरीने २१६ धावा केल्या आणि ११ विकेट्स घेतल्या. गुजरात टायटन्ससोबत असताना हार्दिकने कॅप्टन्सीचे दडपण घेतले नव्हते, परंतु प्रेक्षकांच्या रोषामुळे मुंबई इंडियन्सला नेतृत्व करताना त्याला जड जातेय. त्यामुळेच त्याच्याकडून यंदा कर्णधारपद काढून पुन्हा रोहितकडे जाईल अशी चर्चा होती. हार्दिकला कॅप्टन्सी दिल्यानंतर रोहितही नाराज असल्याच्या वावड्या आहेत...
हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स हार्दिककडून कर्णधारपद काढून घेण्याच्या विचारात नाही. आयपीएल २०२५ मध्येही रिटेन लिस्टमध्ये हार्दिकचे नाव पहिले आहे आणि त्याच्याकडेच कर्णधारपद कायम ठेवण्यावर MI ठाम आहे. BCCI पुढील आठवड्यात किती खेळाडूंना रिटेन करता येईल याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.